Ranveer Singh nude photoshoot : रणवीर सिंहच्या न्यूड फोटोवर कपडे केले दान, व्हिडिओ व्हायरल | पुढारी

Ranveer Singh nude photoshoot : रणवीर सिंहच्या न्यूड फोटोवर कपडे केले दान, व्हिडिओ व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे (Ranveer Singh nude photoshoot) सध्या चर्चेत आहे. आता मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये लोकांनी रणवीरला कपडे दान करण्यास सुरुवात केली आहे. न्यूड फोटोशूटमुळे केवळ वादच नाही तर त्याच्याविरुद्ध तक्रारीही दाखल झाल्या आहेत. याच दरम्यान रणवीरच्या न्यूड फोटोशूटला इंदूरमधील लोकांनी वेगळ्या अंदाजात विरोध दर्शवला आहे. इंदूरमधील ओल्ड पलासिया येथे रणवीरच्या न्यूड फोटोचे पोस्टर लावून त्याला कपडे दान केले जात आहेत. रणवीरच्या पोस्टरवर “मेरे स्वच्छ इंदौर ने ठाना है, देश से मानसिक कचरा भी हटाना है।” असे लिहिण्यात आले आहे. रणवीरच्या पोस्टरवर लोक कपडे दान करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

इंदूरमधील एका (एनजीओने रणवीर सिंहसाठी कपडे दान करण्यासाठी मोहिमेचे आयोजन केले होते. त्यानंतर रणवीरच्या न्यूड फोटोच्या मागे असलेल्या बॉक्समध्ये लोक कपडे दान करत असताना व्हिडिओमध्ये दिसतात. “नेकी की दीवार” नावाच्या स्वयंसेवी संस्थेने कापड दान मोहीम आयोजित केली होती.

रणवीर नेहमी त्याच्या अतरंगी पेहरावाने चर्चेत असतो. यावेळी त्याने न्यूड फोटोशूट केले आहे. हे फोटो त्याचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. यावरुन वादही सुरु आहे. काहींनी त्याच्या फोटोशूटचे समर्थन केले आहे. तर काहींनी विरोध दर्शवला आहे. रणवीरचे म्हणणे आहे की हे केवळ फोटोशूट आहे. तो एक हजार लोकांसमोर न्यूड होऊ शकतो. त्याला काही फरक पडत नाही. न्यूड फोटोशूट प्रकरणी मुंबईतील चेंबूर पोलिस स्थानकात रणवीर सिंह विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

रणवीरने पेपर या मासिकासाठी हे फोटोशूट (Ranveer Singh nude photoshoot) केले होते. हे फोटो अनेकांना आवडले आहेत तर दुसरीकडे अनेकांनी रणवीरला ट्रोलही केले आहे. इंदूरमध्ये रणवीरच्या फोटोशूटवर नाराजी व्यक्त करत लोकांनी म्हटले आहे की देशातूनही मानसिक कचरा काढावा लागेल.

Back to top button