chandrapur : attack on Corporator 
Latest

चंद्रपूर : मनपा नगरसेवकावर अज्ञान युवकांचा प्राणघातक हल्ला

मोनिका क्षीरसागर

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर महानगरपालिकेच्या महाकाली प्रभागाचे नगरसेवक तथा माजी स्थायी समिती सभापती, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष नंदू नागरकर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना आज शुक्रवारी ( दि.४) सकाळच्या सुमारास घडली. काही अज्ञान युवकांनी केलेल्या प्राणघातक हल्यात मनपा नगरसेवक नंदू नागरकर गंभीर जखमी झाले आहेत.

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात व चंद्रपूर शहरात भाईगिरीचे प्रमाण वाढले आहे. क्षुल्लक कारणावरून मोठा वाद निर्माण होत आहे. असाच एक भयावह प्रकार चंद्रपूर मनपाचे नगरसेवक, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष नंदू नागरकर यांच्यासोबत घडला. नेहमीप्रमाणे नागरकर हे सकाळी फिरायला गेले होते. मित्रांसोबत गप्पा करून, ते घरी जायला निघाले. रघुवंशी कॉम्प्लेक्स समोरून, ते आपल्या दुचाकीने घरी जात असताना, सुसाट वाहनचालक युवकाने नागरकर यांनी हटकले. त्यानंतर तो मुलगा नागरकर यांच्याशी वाद घालू लागला. वाद जास्तच वाढल्याने, त्या मुलाने आपल्या दोन मित्रांना बोलावून घेतले.

या अज्ञान युवकांनी नागरकर यांची वाट अडवून, सरळ मारहाण करायला सुरूवात केली. नागरकर यांना खाली पाडत, लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत ते युवक तिथून पळून गेले. रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या नागरकर यांना नागरिकांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. ओळख न पटण्यासाठी त्या मारहाण करणाऱ्या युवकांनी स्वतःचा चेहरा कपड्याने झाकला होता. ऐन मनपा निवडणुकीच्या तोंडावर नागरकर यांच्यावरील हा हल्ला कुणाच्या सांगण्यावरून तरी झाला नाही ना? अश्या चर्चेला आता परिसरात उधाण आले आहे. नागरकर यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचलत का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT