SBI ची नवी ठेव योजना : सेव्हिंग आणि करबचत दोन्ही मिळवा; १ हजारापासून सुरुवात | पुढारी

SBI ची नवी ठेव योजना : सेव्हिंग आणि करबचत दोन्ही मिळवा; १ हजारापासून सुरुवात

मुंबई : पुढारी ऑनलाईन
विविध बँकात ठेव ठेवल्यानंतर त्यावर कर सवलत मिळण्याचीही सुविधा असते. स्टेट बँक ऑफ इंडियाने ५ वर्षांची अशी ठेव योजना सुरू केली असून यातून कर वाचवता येणार आहे. पॅन असलेल्या किंवा अविभिक्त हिंदू कुटुंबातील कर्ता व्यक्तीला ही  कर सवलत घेता येईल.
याची माहिती SBI ने एका ट्वीटमध्ये दिलेली आहे.
SBI Tax Savings Scheme असे या ठेव योजनेचे नाव आहे. यामध्ये कमीतकमी १ हजार तर जास्तीजास्त १.५० लाख रुपये दरवर्षी ठेव स्वरूपात ठेवता येतील. कमीतकमी ५ ते जास्तीजास्त १० वर्षं इतक्या कालवधीसाठी ही गुंतवणूक करता येईल. सर्वसामान्य गुंतवणुकदारांना ५.५ टक्के इतक्या दराने व्याज मिळेल तर ज्येष्ठ नागरिकांना ६.३ टक्के इतका व्याज मिळणार आहे.
ही ठेव ऑनलाईनही करता येईल.

ऑनलाईन ठेव कशी ठेवाल?

SBIच्या ऑनलाईन पोर्टलवर गेल्यानंतर तिथे लॉगिन करा. त्यानंतर फिक्स डिपॉजिटवर क्लिक करा. तेथे eTDR/eSTDR FD वर क्लिक करा. तेथून ठेव ठेवण्याची प्रक्रिया पूर्ण करता येईल.

करसवलत कशी मिळेल?

१.५ लाखपर्यंतची गुंतवणूक ही ८०सी नुसार करसवलत मिळण्यास पात्र आहे. पण आपल्या हाती जे व्याज मिळणार आहे, त्याला मात्र कर द्यावा लागणार आहे. जर ठेवी वरील व्याज १० हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर बँक त्यातून TDS कापून घेईल. TDS वाचण्यासाठी फॉर्म १५जी आणि १५ एच भरून देता येतो.
या ठेवीवर कर्ज काढता येत नाही. शिवाय ठेवीदाराचे निधन झाले तरच मुदतपूर्व रक्कम काढता येते.

Back to top button