चिपळूण (रत्नागिरी); पुढारी वृत्तसेवा : मुंबई -गोवा महामार्गावरील वशिष्टी पुलाचे (वाशिष्ठी पूल) रत्नागिरी- सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत याच्यांसह इतरांच्या उपस्थितीत आज हस्ते उद्घाटन झाले. यानंतर येथील जुना पूल वाहतुकीस बंद करून नवीन वशिष्टी पुलावरून वाहतूक व्यवस्था सुरू करण्यास परवानगी दिली.
मुंबई -गोवा महामार्गावरील वशिष्टी नदीवरील नवीन पुलाचे उद्घाटन रत्नागिरी- सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत, आ. शेखर निकम व गुहागर मतदार संघाचे आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते आज शनिवारी (दि.४) रोजी करण्यात आले. हा उद्घाटन सोहळा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडला.
त्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, आमदार माजी आमदार सदानंद चव्हाण, शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन कदम, काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रशांत यादव, शोकद मुकादम, बाळा कदम यांच्यासह महाविकास अघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
येथील जुना वाशिष्ठी पूल ब्रिटिश कालीन आहे. त्याला ८१ वर्षे झाली असून तो वाहतुकीस धोकादायक बनला होता. आता नवीन विशिष्टी पूल वाहतुकीस खुला झाला आहे.
नवा पूल खुला झाल्याने रत्नागिरी- सिंधुदुर्ग व गोव्यापर्यंत जाणाऱ्या प्रवाशांना जुन्या पुलावरून जाण्याची गरज भासणार नाही. गणेशोत्सव आणि लोकांच्या आग्रहाच्या मागणीवरून हा पूल वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. तर जुना पूल वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. असे येथील प्रशासनाने सांगितले आहे.
हेही वाचलंत का?