"सोलापूर : पुढारी वृत्तसेवा" image="http://"][/author]
मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएमचे राष्ट्रीय
अध्यक्ष खासदार असुदुद्दीन ओवैसी यांनी औरंगाबादनंतर सोलापुरातही 'चलो मुंबई'चा हाक दिली. येत्या 11
डिसेंबर रोजी मुस्लिम आरक्षण व व वक्फ बोर्डाच्या जागेसाठी मुंबईत धडक मारण्याचा इशारा त्यांनी दिला. मराठा आरक्षणाबरोबरच मुस्लिम समाजालाही आरक्षण मिळायलाच हवे, असे म्हणत त्यांनी राज्य सरकार तोफ डागली.
ओवैसी म्हणाले, त्यांनी मराठा समाजाच्या तुलनेत मुस्लिम समाज अधिकच दुर्लक्षित आणि पिछाडीवर असल्याचे यावेळी स्पष्ट केले. ते म्हणाले, राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. महाराष्ट्रात एकही आयएएस आणि आयपीएस अधिकारी मुस्लिम समाजाचा नाही. राज्यात विरोधात असताना काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाचे नेते मुस्लिम समाजाच्या आरक्षाबद्दल बोलत होते.
ते म्हणाले, शिवसेनेला तुम्ही सेक्युलर बनविलं आणि आम्हाला जातीयवादी म्हणतात. तिन्ही पक्ष एकत्र येऊन तुम्ही सरकार चालवितात. तिघेही 'सेक्युलॅरिझम' वाचवायचं आहे म्हणता. पण मुख्यमंत्री ठाकरे विधानसभेत मात्र पुन्हा मंदिर आणि मशिदीबाबत बोलतात. ते सभागृहात खुलेआम म्हणतात की बाबरी मशिद आम्ही पाडली. तेव्हा सेक्युलर राष्ट्रवादी आणि काँग्रेसला लाज का वाटली नाही?
या मेळाव्यासाठी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील, सोलापूरचे निरीक्षक अन्वर सादाद, एमआयएमचे शहर-जिल्हाध्यक्ष फारूक शाब्दी, मुश्तफा शाब्दी, यांच्यासह एमआयएमचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अमर, अकबर, अॅन्थोनी सरकार
ओवैसी म्हणाले, राज्यात असलेले तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार हे अमर, अकबर, अॅन्थोनीचे सरकार आहे. हे तिन्ही पक्ष आपल्या विचाराला तिलांजली देत सत्तेसाठी एकत्र आले आहेत. यांच्यामध्ये विचार हा दुय्यम आहे आणि सत्ता महत्वाची आहे.