नाशिक : स्मार्ट सिटीच्या नावाखाली कोट्यवधींचा खर्च करणार्‍या महापालिकेचा गलथान कारभार स्वागत कमानीवर. (छाया: हेमंत घारेपडे) 
Uncategorized

नाशिक : शहरातील दिशादर्शक कमानींची ‘दशा’; वाहनधारकांची भरकटतेय दिशा

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील प्रमुख मार्गांवर उभारण्यात आलेल्या दिशादर्शक कमानींकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असून, सध्या हे फलक वृक्षांच्या फांद्या आणि बॅनरखाली झाकोळले गेले आहेत. त्यामुळे इच्छित स्थळी पोहोचण्यासाठीची दिशाच समजून येत नसल्याने वाहनचालक भरकटत आहेत.

गेल्या काही वर्षांत नागरिकरणासोबत नाशिक शहराची हद्ददेखील वाढली आहे. चहुबाजूंनी वाढलेल्या शहरात रस्ते, विजेसह अन्य पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महापालिका पार पाडत आहे. वाढत्या शहरासोबत शहरातील प्रमुख मार्गांवर महापालिकेने कमानी उभारल्या असून, त्यावर दिशादर्शक चिन्हे आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांसोबत परगावाहून येणार्‍या पर्यटकांसाठी या कमानी मार्गदर्शक ठरतात. परंतु, या कमानींवर वृक्षांच्या फांदा आणि अनधिकृत बॅनरचे अतिक्रमण वाढल्याने त्या दिशाहीन झाल्या आहेत. परगावाहून येणार्‍या पर्यटकांच्या दृष्टीस हे फलक पडत नसल्याने ते भरकटत आहेत. त्यामुळे अशा पर्यटकांना इच्छित स्थळी पोहोचण्यास स्थानिकांची मदत घ्यावी लागत आहे. त्यात वाहनाचे इंधन आणि वेळ खर्ची पडत असल्याने पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. दुसरीकडे 'स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक आणि स्मार्ट नाशिक'चा नारा दिला जात असताना वृक्षांच्या फांद्या व अनधिकृत बॅनरमुळे झाकोळले गेलेल्या कमानींपायी शहराच्या विद्रूपीकरणात आणखीनच भर पडत आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या नावाखाली कोट्यवधींचा खर्च करणार्‍या महापालिकेचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला असून, नागरिकांमध्ये रोष आहे. महापालिकेने तातडीने या कमानींवरील वृक्षांच्या फांद्या व बॅनर काढून त्या मोकळ्या कराव्या, अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे.

या भागातील दिशादर्शक फलकांची झाली दुरवस्था:-

त्र्यंबकनाका सिग्नल www.pudhari.news
एबीबी सर्कल  www.pudhari.news
त्र्यंबक रोड www.pudhari.news
उंटवाडी रोड www.pudhari.news
आयआयटी सिग्नल www.pudhari.news
ठक्कर डोम मार्ग www.pudhari.news (सर्व छायाचित्रे : हेमंत घाेरपडे)

रंग उडाल्याने नावे देखील गायब
शहरातील काही भागांतील दिशादर्शक फलकांची दुरवस्था झाली असून, त्यावरील रंग उडाले आहेत. त्यामुळे कमानींवरील नगर किंवा परिसराचे नाव अस्पष्ट दिसून येत आहेत. तर काही ठिकाणची नावे पूर्णपणे पुसली गेली आहेत. त्यामुळे नागरिकांना त्याचाही त्रास सहन करावा लागत आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT