नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावर वाघाचा मुक्काम! | पुढारी

नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावर वाघाचा मुक्काम!

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील साकोली येथे गेल्या चार दिवसांपासून वाघाने मुक्काम ठोकला आहे. आज (दि.७) सकाळी मोहघाटा जंगलातून राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना वाघाने पुन्हा दहशत निर्माण केली होती. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गादरम्यान मोहघाटा जंगल आहे. या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे मार्गावर वाहनांच्या वर्दळीसोबतच मजुर असतात. वाघाने या ठिकाणीच तळ ठोकल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. रस्त्याच्या कामावरील मजुर व दुचाकीस्वारांना सांभाळून ये-जा करावी लागत आहे. दरम्यान, परिसरात वाघाचा वावर असल्याने कोणतीही अनुचीत घटना घडू नये याकरिता सर्वांनी वन विभागाला सहकार्य करावं, असे आवाहन चिचगाव क्षेत्र सहाय्यक जितेंद्र वंजारी यांनी केले आहे.

Back to top button