शिऊर, पुढारी वृत्तसेवा : वैजापूर तालुक्यातील निंगोंदगाव येथील शेतात हरभरा धान्य मळणी यंत्रात (थ्रेशर मशीन) हरभरा तयार करत असताना मशीनमध्ये अडकून एका महिलेचा (woman death) जागीच मृत्यू झाला. कविता अरुण दरेकर (वय ३६) असे मृत महिलेचे नाव आहे. ही दुर्घटना मंगळवारी (दि. ८) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, कविता आपल्या निमगाव येथील शेतात कुटुंबातील अन्य व्यक्तीसह मळणी यंत्राच्या साहाय्याने धान्य काढत होत्या. त्यावेळी यंत्राखालील भुस्कट काढण्यासाठी वाकल्या असता त्यांच्या डोक्याचा रुमाल व केस मशीनमध्ये गुंतल्याने मशीनच्या प्रेशरने शरीराचा भाग आत ओढल्या गेल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दरम्यान, त्यांना तत्काळ नातेवाईकांनी मशीनमधून बाहेर काढून खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु डोक्याला गंभीर मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांना शिऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित (woman death) केले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर शिऊर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचलंत का ?
पहा व्हिडिओ : असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी | Anil eye care Hospital