Saba Azad च्या नव्या लूकवर ऋतिक रोशनची ‘ती’ स्पेशल कमेंट

saba and hritik
saba and hritik

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आजकाल तो सबा आझादसोबत दिसत असल्याने त्याची चर्चा होतेय. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्याची नवीन मैत्रीण सबा आझाद असल्याचा अंदाज लावला आहे. सध्या, दोघांच्याकडून त्यांच्या नात्याविषयी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण, सोशल मीडियावर मात्र ऋतिक सबाचे कौतुक करता करता थकत नाहीये.

वास्तविक, सबाने नुकतेच तिचे दोन फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा लूक एकदम वेगळा दिसत आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले, 'तुम्ही मला मिस हेपबर्न आझाद म्हणू शकता!!' यासोबतच तिने स्माईली इमोजीही शेअर केली आहे. त्यानंतर ती लिहिते, 'हो, माझा जन्म चुकीच्या दशकात झाला, मी टाईम ट्रॅव्हल करेन. जेव्हा ते याचा शोध लावतील.'

रिचा चड्ढा, तिलोत्तमा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी सबाच्या या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. पण ऋतिक रोशनने जे लिहिले त्यानं सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतलंय. अभिनेता ऋतिकने 'टाईमलेस' अशी कमेंट लिहिलीय.
याआधीही ऋतिकने सबाच्या पोस्टवर कमेंट केली होती. या पोसटमध्ये ती व्हिडिओत गुनगुनत असताना दिसली होती. तिने लिहिले, 'तुम्ही एक असामान्य व्यक्ती आहात.'

सबा आता ऋतिकच्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसत आहे. याआधी ती रोशन कुटुंबासोबत लंचवर दिसली होती. त्यानंतर घरची आठवण येत असल्याने ऋतिकच्या कुटुंबीयांनी तिला जेवणदेखील पाठवले होते.
या दोघांचे अफेअर सुरू आहे का? याकडे सर्वांच्याच नजरा खिळल्या होत्या. जेव्हा दोघे एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र डिनर करताना दिसले होते. तेव्हापासून ऋतिक आणि सबा यांच्याबाबत रोज नवे वृत्त येत आहे.

आता ऋतिक दीर्घ काळानंतर 'फायटर'मध्ये दिसणार आहे. तो पहिल्यांदा दीपिका पदुकोणसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saba Azad (@sabazad)

 

View this post on Instagram

 

A post shared by Saba Azad (@sabazad)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news