पुणे : पोलिसांच्या माध्यमातून माफीया सेना चालवत आहे सरकार : सोमय्या | पुढारी

पुणे : पोलिसांच्या माध्यमातून माफीया सेना चालवत आहे सरकार : सोमय्या

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा

पोलिसांच्या माध्यमातून माफिया सेना सरकार चालवत आहे. हे सरकार पोलिस आयुक्तांना १०० कोटीची वसुली करण्यास सांगते, असा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला. सोमय्या मंगळवारी (दि. ८) एका खासगी कार्यक्रमानिमित्त जुन्नर तालुक्यात आले असता वारूळवाडी ग्रामपंचायतीला त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आयकर विभागाच्या भानामतीचा खुलासा करू : संजय राऊत

भाजप नेत्या आशाताई बुचके, संतोष नाना खैरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे व इतर मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. वारुळवाडी ग्रामपंचायतीतर्फे सरपंच राजेंद्र मेहेर व सदस्य जंगल कोल्हे यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी उपसरपंच मायाताई डोंगरे व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

Kolhapur Bench : कोल्हापूर खंडपीठासाठी सरकार सकारात्मक; मुख्य न्यायमूर्तींना आजच पत्र देणार : मुख्यमंत्री

बजरंग खरमाटे हा घोटाळेबाज आहे. सरकारमधील मंत्री असणारे अनिल परब यांचे अनधिकृत रिसॉर्ट तसे उद्धव ठाकरे यांचे पीए मिलिंद नार्वेकर यांचे अनधिकृत बंगले पाडायला सरकार सांगते. घोटाळ्यासंबंधित सर्व माहिती आम्ही समाजापुढे आणतो व कायदेशीर कारवाई करतो. त्याचा राग धरून त्यांनी माझ्या मुलाला रात्री दोन वाजता उचलून चौकशीसाठी नेल्याचा आरोप देखील सोमय्या यांनी केला.

युक्रेनमधील सुमी शहरावर रशियाचा एअर स्ट्राइक, दोन मुलांसह ९ ठार

दरम्यान, आपण मागे पुण्यात आला होता, त्यावेळी आपल्यावर हल्ला झाला होता. आता आपण पुन्हा पुण्यात आला आहात, तर आपल्याला भीती वाटत नाही का? यावर उत्तर देताना सोमय्या म्हणाले की, माझ्यावर हल्ला केल्यानंतर त्याची काय किंमत मोजावी लागते हे अनिल परब व संजय राऊत यांना चांगलेच ठाऊक आहे. राऊत यांनी पत्रकार परिषद घेण्याऐवजी घोटाळ्याचा हिशोब द्यावा. समाजाचं, मीडियाचं ध्यान भरकवटण्यासाठी ते व नवाब मलिक पत्रकार परिषद घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

अमरावतीमध्ये गोळीबार करत तरुणीचं फिल्मी स्टाइलनं अपहरण

 

Back to top button