Anupama : अचानक शो सोडणारी कोण आहे अनघा भोसले? | पुढारी

Anupama : अचानक शो सोडणारी कोण आहे अनघा भोसले?

पुढारी ऑनलाईन : छोट्या पडद्यावरील ‘अनुपमा’ ( Anupama ) म्हणजे, अभिनेत्री अनघा भोसलेने रातोरात मालिकेतून ब्रेक घेतला आहे. या मालिकेत तिने ‘नंदिनी’ची मुख्य भूमिका साकारली आहे. यातील ‘नंदिनी’ पात्र चाहत्याच्या पसंतीस उतरले. परंतु, तिने अचानक मालिकेतून ब्रेक घेतल्याने चाहत्यांना धक्का बसला. तर सध्या तिने फिल्मी जगताला रामराम करत अध्यात्माचा मार्ग स्विकारल्याचा खुलासा केला आहे.

‘अनुपमा’ ( Anupama ) मालिकेतील नंदिनी चाहत्यांच्या घराघरात पोहोचली आहे. मालिका गाजत असताना अनुपमा म्हणजे, अनघा भोसलेने यातून ब्रेक घेतला. तिच्या या निर्णयामुळे चाहत्यांना धक्का बसला. याच दरम्यान तिने एका बेवसाईटला दिलेल्या मुलाखतीत आपण शांतीच्या शोधात असून अध्यात्माच्या मार्गावर जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. सध्या अनघा पुण्याला गेली असून काही दिवस ती तेथेच राहणार आहे.

मुलाखतीत अनघाने ‘इंडस्ट्रीतील ढोंगीपणाला कंटाळले असून बॉलिवूडच्या झगमटात काम करण्याची इच्छा नाही. इंडस्ट्रीतील अनेक लोक प्रत्येक पावलावर दुटप्पी, ढोंगीपणा दाखवतात. काही वेळी आपल्याला आवडत नसलेल्या भूमिका कराव्या लागतात. यासाठी आमच्यावर सततचा दबाव असतो. स्पर्धा इतकी वाढली आहे की, प्रत्येक जण एकमेकांना तुडवत पुढे कसे जाता येईल याच्या प्रयत्नात असतात. अगदी सोशल मीडियावर सक्रिय राहण्यासाठाही सतत दबाव असतो’ असे तिने सांगितले आहे.

अ‍ॅक्टिंग सोडायची इच्छा आहे

यापुढे तिने ‘मला आता शांती हवी आहे. म्हणूनच मला नकारात्मक गोष्टी सोडून अध्यात्माचा मार्ग स्वीकारायचा आहे. तसेच मी सध्या अ‍ॅक्टिंग सोडण्याचा अधिकृतपणे निर्णय घेतलेला नाही. मला पुन्हा ‘अनुपमा’ या मालिकेत दिग्दर्शकांनी बोलावले तर जाईलही कदाचित. परंतु, भविष्यात अ‍ॅक्टिंग सोडायची माझी इच्छा आहे.’ असे ती म्हणाली.

पारसची प्रतिक्रिया

‘अनुपमा’ ( Anupama ) या मालिकेत सहकलाकार पारसने अनघाच्या या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यात त्याने ‘अनघासोबत शूटिंग करायची सवय झाली आहे. आम्ही दोघे चांगले मित्र आहोत. मला तिची नेहमीच आठवण येत राहिल, तिच्या निर्णयाचा मी आदर करतो. पण तिला अभिनयाची आवड असेल तर ती नक्कीच परत यावे. अशी माझी आशा आहे.

कोण आहे अनघा भोसले?

अनघाला लहानपणापासूनच अभिनेत्री बनण्याची इच्छा होती. पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात २७ जानेवारी २००० जन्म झाला. अनघाने २०२० मध्ये टीव्ही मालिका “दादी अम्मा…दादी अम्मा मान जाओ!” मध्ये तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यात तिने ‘श्रद्धा झंवर’ ची भूमिका साकारली होती. ऑडिशनच्या एका वर्षानंतर तिला ‘अनुपमा’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली.

याशिवाय अनघा भोसले नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असून आपले हटके फोटो शेअर करत असते. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर ब्लॅक रंगाच्या जरकिनमध्ये फोटो शेअर केले आहेत. या फोटोतील खास म्हणजे. तिने केलेल्या केंसाच्या हेअरस्टाईलमुळे तिचा लुक बदलला आहे. शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

सोशल मीडियावर हे फोटो शेअर होताच चाहत्यांनी तिला चांगलेच घारेवर धरले आहे. यात एका युजर्सने ‘तुम्ही खरचं यूएसला गेला आहात काय?. तुला अनुपमामधून काढून टाकण्यात आले तेव्हाच तुझी अशी अवस्था झाली आहे काय?, तू अध्यात्माच्या मार्गावर चालली होतीस ना मग हे काय?’ असे म्हटले आहे. आणखी काही युजर्सनी ‘प्लीज प्लीज प्लीज अनुपमा परत ये, तुझा लूक अप्रतिम आहे.’ असे म्हटले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button