Latest

रशिया युक्रेनच्या राजधानीपासून हाकेच्या अंतरावर ! सततच्या हल्ल्याने परिस्थिती अत्यंत भयावह

backup backup

कीव्ह; पुढारी ऑनलाईन : रशियाच्या सततच्या हल्ल्यांमुळे युक्रेनमधील परिस्थिती अत्यंत भयावह बनली आहे. मात्र रशिया थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. त्याच वेळी, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची मनोवृत्ती गेल्या काही दिवसांत मवाळ झाली आहे, पण तरीही त्यांनी अजून कोणतीच स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. अशा परिस्थितीत रशियाचे अध्यक्ष पुतिनही थांबण्याचे नाव घेत नसल्याचे स्पष्ट आहे.

दरम्यान, युक्रेनमधील बहुतांश शहरे स्फोटांच्या भयानक आवाजाने दुमदुमत आहेत. आता युक्रेनचे लोक आपला देश सोडून सुरक्षित ठिकाणांच्या शोधात इतर देशांमध्ये वेगाने स्थलांतर करत आहेत.

युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी जर्मनीचे माजी चॅन्सेलर गेरहार्ड श्रोडर यांनी गुरुवारी संध्याकाळी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची अनेक तास भेट घेतली. जर्मनी मीडिया बिल्ड अॅम सोनटॅग (बीएएमएस) ने देखील बैठकीची पुष्टी केली. साप्ताहिक वृत्तपत्राने, श्रोडर यांची तपशीलवार माहिती असलेल्या एका व्यक्तीचा हवाला देऊन सांगितले की, श्रोडर यांनी पुतीन यांच्या जवळच्या सल्लागारांपैकी एकाशी दीर्घ चर्चा केली.

अमेरिकेने २०० दशलक्ष डॉलर्सची मदत जाहीर केली

युक्रेनसाठी अतिरिक्त लष्करी उपकरणे खरेदी करण्यासाठी अमेरिकेने २०० दशलक्ष डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी शनिवारी युक्रेनसाठी २०० दशलक्ष डॉलर अतिरिक्त लष्करी उपकरणे मंजूर केली. रशियाच्या वाढत्या हल्ल्यामुळे अमेरिका मदत करत आहे असून युक्रेनकडे संसाधने कमी आहेत.

रशियन हल्ल्यानंतर युक्रेनमधील बहुतेक रहिवासी भाग पूर्णपणे निर्जन झाले आहेत. येथे सुरू असलेल्या युद्धामुळे दोन्ही देश एकमेकांसमोर झुकायला तयार नाहीत. रशियाला नेहमीच कीव्ह आपल्या ताब्यात घ्यायचे आहे. रशियन सैन्याने म्हटले आहे की काही युक्रेनियन शहरांमधील मानवतावादी परिस्थिती 'विनाशकारी' आहे.

मानवी कॉरिडॉरमधून १३ हजार नागरिकांना बाहेर काढले

रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, रशियाच्या हल्ल्यादरम्यान युक्रेनमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. युक्रेनच्या डेप्युटी पीएम इरिना वेरेशचुक यांनी दावा केला आहे की युक्रेनने १२ मार्च रोजी मानवी कॉरिडॉरमधून १३ हजार नागरिकांना बाहेर काढले, जे आदल्या दिवसाच्या तुलनेत दुप्पट आहे. या संदर्भात, ११ मार्च रोजी, सुमारे ७ हजार ५०० लोकांना मानवी कॉरिडॉरमधून बाहेर काढण्यात आले.

युक्रेनने दिलेल्या माहितीनुसार रशियन सैनिकांनी कीव्ह जवळील एका गावाबाहेर महिला आणि मुलांच्या गटावर गोळ्या झाडल्या, ज्यात सात जण ठार झाले, त्यापैकी एक चिमुरडा होता. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ११ मार्च रोजी महिला आणि मुलांचा एक गट कीव ओब्लास्टमधील पेरेमोहा गावातून सुरक्षित ठिकाणी जात असताना हा हल्ला झाला.

रशिया-युक्रेन संकटादरम्यान Google आता आपल्या युक्रेनियन अँड्रॉइड युझर्सना एअर स्ट्राइक अलर्ट जोडत आहे. GSM Arena च्या म्हणण्यानुसार, हे अपडेट Google च्या Play Services चा भाग म्हणून आले आहे आणि अहवालानुसार, कंपनी युक्रेनियन सरकारच्या विनंतीनुसार ते आणत आहे. Android सूचना युक्रेनियन सरकारने आधीच पाठवलेल्या अलर्टवर आधारित असतील.

युक्रेनच्या अधिकार्‍यांनी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी, युनायटेड नेशन्स न्यूक्लियर वॉचडॉग यांना माहिती दिली की रशिया झापोरिझ्झ्या अणु प्रकल्पावर संपूर्ण नियंत्रण ठेवण्याची योजना आखत आहे. मात्र, या दाव्याला अद्याप पुष्टी मिळालेली नाही.

झेलेन्स्की यांची इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांच्याशी चर्चा

युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी युक्रेनमधील युद्धाच्या स्थितीबद्दल इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांच्याशी चर्चा केली आणि मेलिटोपोल महापौरांच्या सुटकेसाठी त्यांची मदत मागितली. ट्विटरवर, झेलेन्स्की यांनी लिहिले, इस्रायलचे पंतप्रधान @naftalibennett यांच्याशी चर्चा सुरू आहे. आम्ही रशियन आक्रमण आणि शांतता चर्चेच्या शक्यतांबद्दल बोललो. आम्ही नागरिकांवरील दडपशाही थांबवली पाहिजे."

स्थानिक मीडिया आउटलेटनुसार, युक्रेनच्या सशस्त्र दलाने सांगितले की खेरसन ओब्लास्टमध्ये दोन रशियन हेलिकॉप्टर पाडण्यात आले. कीव इंडिपेंडंटने सांगितले की जखमी वैमानिकाला रुग्णालयात नेण्यात आले. यापूर्वी युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा म्हणाले की, २०१४ मध्ये पूर्व युक्रेन आणि क्राइमियामध्ये जे केले गेले होते त्याचे अनुकरण करून रशिया खेरसनमध्ये फुटीरतावादी "सार्वमत" आयोजित करण्याचा प्रयत्न करीत आहे.

झापोरिझ्झ्या प्रादेशिक प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, युक्रेनच्या मेलिटोपोल शहरात नवीन महापौरांची नियुक्ती करण्यात आली असून निवडून आलेल्या महापौरांना रशियन सैन्याने ताब्यात घेतले आहे. निर्वाचित महापौर इव्हान फेडोरोव्ह यांना शुक्रवारी रशियन सैन्याने ताब्यात घेतले. दुसरीकडे, युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या फेसबुक अकाऊंटवर मेलिटोपोलच्या महापौरांना ताब्यात घेतल्याचा तीव्र निषेध केला.

हे ही वाचलं का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT