Latest

Twitter Down : वेब ट्विटर लॉग इन करताना एरर…

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : ट्विटर युजर्स ट्विटरवर  लॉग इन करताना गुरुवारी (दि.२९) सकाळपासून अडचणी येत आहेत. लॉग इन करताना एरर येत आहे.   भारतातील अनेक ट्विटर युजर्सना  डेस्कटॉपवर ट्विटर चालवण्यात अडचणी येत आहेत. गुरुवारी सकाळी 6:28 वाजल्यापासून ट्विटर युजर्सना सतत ट्विटर डाउन (Twitter Down) होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेलं ट्विटर गेल्या अनेक दिवसांपासून सतत चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे कंपनीचे नवे मालक इलॉन मस्क आणि त्यांनी ट्विटर संदर्भात घेतलेले निर्णय. ट्विटरने गेल्या महिन्यात ब्लू टिक व्हेरिफिकेशन आणि प्री-व्हेरिफाइड अकाउंट्ससाठी पेड सबस्क्रिप्शन सेवा सुरू केली आहे.

अनेक युजर्सनी स्क्रीनशॉट शेअर केले असून त्यात दिसत आहे की लॉग इन करण्यामध्ये समस्या येत आहे. लॉग इन करताच  "Something Went Wrong please try Again" आणि Refresh log out हा पर्याय येत आहे.

Twitter Down : कोण असेल ट्विटरचा नवा सीईओ

भारतीय-अमेरिकन असलेले शिवा अय्यादुराईं यांनी ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटचा सीईओ व्हायची इच्छा व्यक्त केली आहे. या संदर्भात त्यांनी ट्विटरला ट्विट केले आहे आणि ट्विटरचे विद्यमान सीईओ एलन मस्क यांना टॅग केल आहे. ट्विटमध्ये शिवा यांनी ट्विटरचे विद्यमान साईओ एलन मस्क यांनाही टॅग केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की," मी ट्विटरचा सीईओ पदी येण्यास इच्छूक आहे. माझ्याकडे MIT मधून घेतलेल्या एकूण 4 डिग्री आहेत आणि मी आतापर्यंत एकूण 7 हाय-टेक सॉफ्टवेअर कंपन्या स्थापन केल्या आहेत. कृपया तुम्ही मला या पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सांगा".

 एलन मस्क यांनी १९ डिसेंबरला त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर  एक पोल घेतला होता. त्यामध्ये त्यांनी नमूद केले होते की, आपण ट्विटरच्या सीईओ पदावरुन पायउतार व्हावे का? जो काही निकाल येईल त्याचे मी पालन करेन. मस्क यांच्या या पोलला अनेकांनी कमेंट्स करत प्रतिसाद दिला. अनेकांनी आपण या पदासाठी इच्छूक असल्याचेही सांगितले. जगातील सर्वाधिक कमाई करणारा युट्यूबर मिस्टर बीस्ट यांनीही आपण ट्विटरचा सीईओ होण्यासाठी इच्छूक असल्याचे सांगितले होते. 

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT