Latest

सर्व प्रौढांना बूस्टर डोस देण्याची सरकारची योजना

अनुराधा कोरवी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: चीन, दक्षिण कोरिया तसेच युरोपसह जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना दक्ष राहण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान आता सर्व प्रौढ लोकांना बूस्टर डोस देण्याची योजना केंद्राकडून आखली जात आहे, अशी माहिती सोमवारी सूत्रांनी दिली. सध्या ६० वर्षांवरील लोकांना बूस्टर डोस दिला जात आहे.

बूस्टर डोस कधीपासून देण्यात येणार? आधीच्या दोन डोसप्रमाणे तो मोफत असणार की नाही? आदी बाबींचा खुलासा लवकरच सरकारकडून केला जाणार आहे. भारतात मागील हिवाळ्यात कोरोनाची तिसरी लाट आली होती. ही लाट नियंत्रणात आली असली तरी चीनसह शेजारी देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातल्याने चिंतेची परिस्थिती निर्माण झाली आहे.

चीनमध्ये अनेक शहरांत लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. तर दक्षिण कोरियामध्ये दैनदिन रुग्णसंख्येचा आकडा सहा लाखांवर पोहोचला आहे. शिवाय युरोपमधील अनेक देशांत कोरोनाने डोके वर काढलेले आहे.

देशात सध्या ६० वर्षांवरील लोकांना तसेच फ्रंटलाइन वर्कर्सना बूस्टर डोस देण्यात येत आहे. १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना लस देण्याच्या मोहिमेला देखील सुरुवात करण्यात आली आहे. देशात सक्रिय रुग्णांची संख्या २५ हजारांच्या आसपास आहे. दैनदिन रुग्ण वाढीचा आकडा बराच कमी झाला आहे, पण असे असले तरी आयआयटी, कानपूरने जूनच्या अखेरपासून चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणांच्या चिंतेत भर पडली आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT