चीनमध्‍ये १३२ प्रवाशांना घेवून जाणार्‍या विमानाला अपघात | पुढारी

चीनमध्‍ये १३२ प्रवाशांना घेवून जाणार्‍या विमानाला अपघात

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : चीनमध्‍ये १३२ प्रवाशांना घेवून जाणार्‍या जेट बोइंग विमानाला अपघात झाला आहे. वृत्तसंस्‍था ‘एएफपी’ने दिलेल्‍या माहितीनुसार, विमानाला दक्षिण चीनमध्‍ये वुझोऊ शहराजवळच्‍या डोंगरामध्‍येअपघात झाला असून, आपत्ती निवारण दलाचे पथक घटनास्‍थळी रवाना झाले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, विमानाला आग लागली यानंतर ते डोंगरात कोसळले. चीनमधील सरकारी वृत्तसंस्‍था ग्‍लोबल टाइम्‍सने दिलेल्‍या माहितीनुसार, विमानाने युन्‍नान प्रांतातील कुनमिंग विमानतळावरुन दुसारी १ वाजून १५ मिनिटांनी उड्‍डाण केले. हे विमान दक्षिण चीनमधील गुआंगडोंग प्रांतातील गुआंगझू विमानतळावर दुपारी ३ वाजून ७ मिनिटांनी उतरणार होते. अपघातानंतर आपत्ती निवारण पथकाने घटनास्‍थळी धाव घेतली. मात्र या अपघाताबाबत चायना इस्‍टर्न एअरलाइन्‍सशी संपर्क झालेला नाही. दरम्‍यान, या अपघातानंतर अमेरिकेच्‍या शेअर बाजारात चायना इस्‍टर्न एअरलाइन्‍सचे शेअर १० टक्‍क्‍यांनी घसरले.

हेही वाचलं का?

 

Back to top button