TATA ग्रुपच्या 'या' कंपनीचा जगात डंका ; जगात एक नंबरला येण्यापासून फक्त एक पाऊल दूर 
Latest

TATA ग्रुपच्या ‘या’ कंपनीचा जगात डंका ; जगात एक नंबरला येण्यापासून फक्त एक पाऊल दूर

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क

देशात आज प्रजासत्ताक दिना निमित्त सगळीकडे तिरंगा फडकवला जात आहे. याचवेळी TATA ग्रुपच्या एका कंपनीचा डंका जगात वाजत आहे. ही कंपनी सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये शिखरावर पोहचण्यापासून एक पाऊल पाठीमागे आहे.

TCS जगातील दुसरी मौल्यवान IT कंपनी

TATA ग्रुपची सॉफ्टवेअर कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला (TCS) आयटी सेक्टरमध्ये जगातील दुसरा सगळ्यात मौल्यवान ब्रॅन्ड म्हणून निवडण्यात आला आहे. Brand Finance 2022 Global 500 च्या यादीमध्ये Accenture नंतर TCS हा सर्वात मजबूत IT सेवा ब्रँड म्हणून उदयास आला आहे.

TATA ग्रुप टॉप १०० मध्ये

या यादीमध्ये जगातील मजबुत ब्रॅन्डला निवडले आहे. Top-500 Most Valuable Brand या यादीमध्ये भारतातून टॉप-१०० मध्ये भारतातील एकमेव टाटा कंपनी आहे. TCS स्वतंत्रपणे लिस्टमध्ये नाही, पण टाटा समूहाची कंपनी म्हणून समावेश आहे. या यादीत अॅपलची जगातील सर्वात मौल्यवान ब्रँड म्हणून निवड झाली आहे.

इन्फोसिस तिसऱ्या नंबरला

आयटी क्षेत्रात भारतीय कंपन्यांचा दबदबा आहे. भारताची इन्फोसिस या बाबतीत टीसीएसच्या मागे आहे आणि जगातील तिसरा सर्वात मौल्यवान आयटी ब्रँड आहे.

टीसीएस आणि इन्फोसिसने Brand Finance च्या या रॅकिंगमध्ये एक पाऊल पुढं टाकलं आहे. आणि आयबीएम सारख्या कंपनीला पाठिमागे टाकलं आहे. आयबीएम आता या यादीमध्ये जगातील चौथा मौल्यवान ब्रॅन्ड आहे.

हेही वाचलत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT