२७ वर्षीय शंतनू नायडू रतन टाटांचा सेक्रेटरी कसा झाला? | पुढारी

२७ वर्षीय शंतनू नायडू रतन टाटांचा सेक्रेटरी कसा झाला?

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक असलेल्या रतन टाटा यांचा ८४ वा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ते एका २७ वर्षीय तरुणासोबत दिसत आहे. सुरुवातीला तो तरुण त्यांचा नातेवाईक असल्यासारखं वाटत आहे. पण तो तरुण त्यांच्या नात्यातील कोणीही नाही. हा तरुण रतन टाटा यांचा सेक्रेटरी आहे. त्याच नाव शंतनू नायडू आहे.

रतन टाटा यांनी त्यांच्या व्यावसायिक जीवनाची सुरुवात जमशेदपूर येथून केली. टाटा समुहाच्या कुटुंबातील असूनही त्यांनी पदवीधर प्रशिक्षणार्थी म्हणून आपले प्रारंभिक जीवन सुरू केले. त्यांच्याविषयी अनेक किस्से आपण ऐकले आहेत. रतन टाटा यांचा सेक्रेटरी फक्त २७ वर्षीय तरुण आहे. शंतनू नायडू एवढ्या कमी वयात टाटांच्या सेक्रेटरी पदापर्यंत कसा पोहचला हा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याचा सेक्रेटरी पर्यंतचा प्रवासही रंजक आहे.

कुत्र्यावरील प्रेमामुळे झाली मैत्री

शंतनू नायडू यांना एकदा एक कुत्रा रस्त्यावर मृत अवस्थेत दिसला. कार चालकाला अंधारात कुत्रा दिसला नसल्यामुळे हा अपघात झाल्याचे त्याच्या लक्षात येते. अशा भटक्या कुत्र्यांना अपघातापासून वाचवण्यासाठी शंतनू नायडू प्रयत्न करु लागला. शंतनू भटक्या प्राण्यांच्या गळ्यात एक चमकदार पट्टा घालण्याचं त्याला सुचलं. त्याने त्याचा हा विचार उद्योगपती रतन टाटा यांच्यापर्यंत पोहोचवला. शंतनू नायडूची ही कल्पना रतन टाटा यांना आवडली. नंतर रतन टाटा यांनी नायडूंना मोटो पॉज सुरू करण्यास मदत केली. जी रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांसाठी आणि गायींसाठी बनवली.

भटक्या प्राण्यांना मदत करण्यासाठी शंतनू आणि रतन टाटा यांनी पहिल्यांदा ई-मेल वरुन संवाद साधला. त्यानंतर त्यांच्या या संवादाचे रुपांतर मैत्रीत झाले. शंतनू नायडू मुळे रतन टाटा सोशल मीडियावर आले. शंतनूने रतन टाटा यांना हॅशटॅग, ट्रेंड आणि इमोजीबद्दल सर्व सांगितले. रतन टाटा हे एक मोठे उद्योगपती म्हणून जगभर ओळखले जातात. पण इन्स्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुकमुळे त्यांची वैयक्तिक बाजूही जाणून घेण्याची संधी मिळाली. रतन टाटा हे देशातील अशा काही उद्योगपतींपैकी एक आहेत ज्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत.

रतन टाटा आणि शंतनू यांच्या वयात सुमारे 60 वर्षांचा फरक आहे. असे असूनही, दोघांमध्ये चांगली मैत्री आहे. शंतनूचे उच्च शिक्षण  कॉर्नेल विद्यापीठात झाले आहे. ते तिकडे गेला तेव्हाही त्यांची मैत्री कमी झाली नाही. शंतनू नायडू त्याचे शिक्षण पूर्ण करून भारतात परत आला तेव्हा रतन टाटा यांनी त्याला सेक्रेटरी बनण्याची ऑफर दिली. शंतनू आणि रतन टाटा रस्त्यावर अपघात झालेल्या भटक्या प्राण्यांना मदत करण्यासाठी एकत्र काम करतात. यासोबतच शंतनू रतन टाटा यांच्या ऑफिसमध्येही काम करतो.

हेही वाचलत का?

Back to top button