Austrialia tour pakistan : ऑस्ट्रेलियाला पाकिस्तानात दहशतवादी हल्ल्याची भीती | पुढारी

Austrialia tour pakistan : ऑस्ट्रेलियाला पाकिस्तानात दहशतवादी हल्ल्याची भीती

सिडनी; पुढारी ऑनलाईन

ऑस्ट्रेलियाचा ( Austrialia tour pakistan ) आगामी पाकिस्तान दौऱ्यावर संशयाचे ढग दाटू लागले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना पाकिस्तानमध्ये जाऊन खेळण्याबाबत चिंता वाटू लागली आहे. सिडनी मॉर्निंग हेरॉल्ड या दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार ऑस्ट्रेलियन खेळाडुंना पाकिस्तानातील आंतकवादी हल्ल्याची भीती सतावत आहे. २४ वर्षानंतर ऑस्ट्रेलियाचा दौरा पाकिस्तानात आयोजित केला जातो आहे, पण आता या दौऱ्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

या दौऱ्याबाबत ऑस्ट्रेलियाने ( Austrialia tour pakistan ) वक्तव्य केले होते की, आमच्या खेळाडुंच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य दिले जाईल. याशिवाय ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्ड (सीए) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड दोघे मिळून या दौऱ्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून आखणी करत आहेत. ऑस्ट्रेलियन बोर्ड त्यांच्या खेळाडूंशी पाकिस्तानातील सुरक्षा व्यवस्थेबाबत सुद्धा चर्चा करत आहेत. ऑस्ट्रेलिया संघाचे निवड प्रमुख जार्ज बेली यांनी सुरक्षेकडे अधिक लक्ष देत ती अधिक भक्कम करण्यात आल्याचे म्हटले आहे.

यापूर्वी ऑस्ट्रेलिया ( Austrialia tour pakistan ) संघाने मार्क टेलरच्या नेतृत्त्वाखाली १९९८ साली पाकिस्तानचा दौरा केला होता. निवड प्रमुख जॉर्ज बेली म्हणाले की, बोर्ड अजून दौऱ्याला घेऊन अनेक बाबींवर विचार करत आहे. जेव्हा सर्व योग्य वाटेल, औपचारिक संमती मिळेल, तेव्हाच आम्ही अंतिम संघाची घोषणा करु, आम्ही योग्य दिशेन काम करीत आहोत.

पाकिस्तानमध्ये सुरक्षा व्यवस्था कोलमडलेली आहे. अफगानिस्तानात जेव्हापासून तालिबानी पुन्हा सत्तेत आले आहे तेव्हापासून पाकिस्तानची स्थिती आणखी बिघडली आहे. मागील वर्षी न्यूझीलंड संघाने सामना सुरु होण्याच्या ऐन वेळी दौरा रद्द करत पाकिस्तानातून काढता पाय घेतला होता. यापुर्वी २००९ साली श्रीलंका संघाच्या बसवर पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. तेव्हापासून अनेक वर्षांपासून आतंरराष्ट्रीय संघानी दौरा केलेला नाही.

सध्या ऑस्ट्रेलिया संघ अत्यंत मजबूत स्थितीमध्ये असल्याचे वाटत आहे. त्यांनी नुकतेच इग्लंड संघास आपल्या देशात ४-० ने पराभूत केले आहे. या दौऱ्यात स्कॉट बोलंड, ट्रॅविस हेड आणि उस्मान ख्वॉजा सारख्या खेळाडूनी उत्तम कामगिरी बजावली आहे. ऑस्ट्रेलिया पाकिस्तानमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार असून पहिला सामना ३ मार्च रोज कराचीमध्ये खेळवला जाणार आहे. पण, ज्या ऑस्ट्रेलिया खेळाडुंना वाटणारी चिंता आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची डोकेदुखी ठरत आहे.

Back to top button