वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायलन दरम्यान कर्णधार विराट आणि राहाणे – पुजारा यांच्यात वाद झाल्याच्या बातम्या काही दिवस येत आहेत. विराट आणि रहाणे – पुजारा यांच्यात वाद झाल्यानंतर रहाणे – पुजाराने बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्याकडे त्याची तक्रार केली होती असा दावा काही माध्यामांनी केला आहे. तसेही विराट कोहलीने टी20 वर्ल्डकपनंतर टी20 संघाचे नेतृत्व सोडण्याची घोषणा केली होती तेव्हापासूनच संघात वाद असल्याचे वृत्त येत होते.
अखेर या वृत्तांवर बीसीसीआयने आपले म्हणणे मांडले आहे. बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमल यांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी अशी कोणतीही तक्रार बीसीसीआयकडे आलेलीच नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, 'माध्यामांनी काहीही लिहणे थांबवले पाहिजे. मी हे ऑन रेकॉर्ड सांगू इच्छितो की कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूने बीसीसीआयकडे कोणताही तक्रार केलेली नाही. लिखीत आणि तोंडी कोणतीही नाही. बीसीसीआय प्रत्येक खोट्या वृत्ताला उत्तर देऊ शकत नाही. कोणतरी उठतो आणि दुसऱ्या दिवशी म्हणतो की टी20 वर्ल्डकपचा संघ बदलणार आहे. तुम्हाला असं कोणी सांगितलं?'
धुमल पुढे म्हणाले की, 'अशा प्रकारचे रिपोर्टिंग भारतीय क्रिकेटसाठी नुकसानदायक आहे. आम्ही एखादा वरिष्ठ पत्रकार जो बऱ्याच काळापासून क्रिकेट कव्हर करत आहे. त्याने जर टीम इंडियाने काय करावे आणि काय करुन नये असे मत व्यक्त करणे समजू शकतो. त्यांच्या यामताचा आदरच आहे. अशी निरीक्षणे नोंदवणे त्यांचे कामच आहे. मी सुद्धा अशा प्रकराचे वृत्त वाचण्याचा आनंद घेत असतो. मात्र कोणी तुकड्या तुकड्यातील माहिती ज्याच्यात काही तथ्य आहे की नाही हे न पाहता एकत्र करुन एक गोष्ट तयार करायची आणि सांगायची हे चांगले नाही.'
विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याबाबातही धुमल यांनी खुलासा केला की, 'विराटने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय स्वतःहून घेतला आहे. याबाबत बीसीसीआयने कोणताही निर्णय घेतलेला नाही किंवा चर्चाही केलेली नाही. हा निर्णय सर्वस्वी विराट कोहलीचा होता.
[box type="shadow" align="" class="" width=""][visual_portfolio id="45839"][/box]