नवी दिल्ली : राजस्थान रॉयल्स संघाचा फिरकीपटू श्रेयस गोपाळ बुधवारी लग्नबंधनात अडकला. श्रेयसने निकिता शिव हिच्याशी लग्न केले. कर्नाटकच्या गोलंदाजाने आयपीएलमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख तयार केली आहे.
त्याने 64 प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 2,674 धावा आणि 191 विकेटस् घेतल्या आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने 47 सामन्यांत 77 विकेटस्, तर 82 टी-20 सामन्यांत 91 विकेटस् त्याच्या नावावर आहेत. त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये एका डावात पाच विकेटस् घेण्याचा पराक्रम केला आहे. 2014 च्या आयपीएल ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने त्याला 10 लाखांत आपल्या ताफ्यात घेतले होते. 2013-14 च्या रणजी करंडक स्पर्धेत त्याने 22 विकेटस् घेत कर्नाटकच्या जेतेपदात महत्त्वाचा वाटा उचलला होता.