शरीफांना फसवून इम्रानना सत्तेत आणले

शरीफांना फसवून इम्रानना सत्तेत आणले
Published on
Updated on

पाकिस्तानमध्ये सध्या एका ऑडिओ टेपने जोरदार खळबळ उडवून दिली असून, यामध्ये पाकिस्तानी लष्कराच्या कारनाम्याचा बुरखा फाडण्यात आला आहे. विशेष म्हणजे टेपमधील काही भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यात पाकिस्तानचे माजी सरन्यायाधीश साकिब निसार हे एका व्यक्तीशी बोलत असून, त्यात माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम नवाज यांना शिक्षा देण्यासाठी त्यांच्यावर दबाव होता, जेणेकरून इमरान खान यांना सत्तेत आणता येईल,

असे सांगत असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे.ही टेप शोधपत्रकार अहमद नुरानी यांनी समोर आणली आहे. विशेष म्हणजे यातील आवाज आपलाच असल्याचे निसार यांनी म्हटले आहे. तथापि, त्यात काही जुन्या घटनांचे तुकडे जोडले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दुसरीकडे द डॉनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ही टेप अस्सल आहे. त्यात तुकडेजोड किंवा छेडछाड केली नसल्याचा निर्वाळा अमेरिकन फॉरेन्सिक कंपनीने दिला आहे.

तीन वर्षांपूर्वी पाकिस्तानात सत्तापालट होऊन इमरान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ या पक्षाचे सरकार सत्तेत आले. आता या ऑडीओ टेपमधील आवाज निसार यांचाच असल्याचे मानले तर इमरान खान यांचा त्या निवडणुकीत कसलाही करिष्मा नव्हता; तर ते केवळ लष्कराच्या पाठींब्यामुळेच ते सत्तेत आल्याचे स्पष्ट होते.

काही दिवसांपूर्वी ही ऑडिओ टेप समोर आली आहे. त्यात माजी सरन्यायाधीश एका अज्ञात व्यक्तीबरोबर बोलताना आपल्याला झालेला त्रास सांगताहेत. पाकिस्तानात न्यायपालिका स्वतंत्र नाही. ती लष्कराच्या दबावाखाली आहे, अशी आगतिकता व्यक्त करत आहेत. ही टेप 2018 मध्ये झालेल्या तेथील सार्वत्रिक निवडणुकीच्या काही दिवस आधीची आहे.

त्यावेळी इमरान खान इस्लामाबादमध्ये रॅली करत होते. नवाज शरीफ यांच्यावर भ्रष्टाचार, चोरी आणि लष्कराला बदनाम करण्याचे आरोप करीत होते. त्यानंतर पनामा पेपर्स आणि इतर खटल्यांत नवाज यांना 10 वर्षे आणि त्यांची मुलगी मरीयमला आठ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांना तुरूंगात पाठवण्यात आले. त्यानंतर नवाज शरीफ उपचारासाठी लंडनला गेले. ते अद्याप परतलेले नाहीत. तर मरियमने शिक्षेविरोधात अपिल केले आहे. त्यावर सुनावणी झालेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news