Vaibhav Sooryavanshi India Debut  Pudhari
स्पोर्ट्स

Vaibhav Sooryavanshi : 'मला फक्त एवढीच आशा..'; वैभव सूर्यवंशीच्या टीम इंडियाकडून पदार्पणापूर्वी राहुल द्रविडचा मोलाचा सल्ला

Vaibhav Sooryavanshi India Debut : वैभव सूर्यवंशी क्रिकेटची समज आणि निर्भयता याचे एक अप्रतिम मिश्रण

पुढारी वृत्तसेवा

Vaibhav Sooryavanshi India Debut : आयपीएल 2026 चा हंगाम सुरू झाला आणि क्रिकेट जगतात एकाच नावाचे वादळ घोंगावू लागले... ते नाव म्हणजे वैभव सूर्यवंशी! अवघ्या १५ वर्षांच्या या 'वंडर बॉय'ने मैदानात उतरताच आपल्या बॅटने जगभरातील दिग्गज आणि अनुभवी गोलंदाजांची अक्षरशः पळता भुई थोडी झाली. वैभवच्या या अद्भूत आणि वादळी कामगिरीची दखल घेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) त्याला थेट 'टीम इंडिया'चे तिकीट दिले. आता वैभव एका ऐतिहासिक उंबरठ्यावर उभा असून, भारताचा सर्वात तरुण आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू बनण्याचा मान मिळवण्याच्या तो अगदी जवळ आहे. दरम्यान, त्याच्या या ऐतिहासिक महा-पदार्पणापूर्वी भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी वैभवला एक अत्यंत मोलाचा सल्ला दिला आहे.

वैभव रचणार नवा इतिहास

शुक्रवारी बेलफास्ट येथे आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्यात भारत सूर्यवंशीला पदार्पणाची संधी देईल अशी दाट शक्यता आहे. वै तो या सामन्यात खेळला, तर त्याचे वय १५ वर्षे आणि ९१ दिवस असेल. म्हणजेच, सचिन तेंडुलकरने १९८९ मध्ये वयाच्या १६ व्या वर्षी आणि २०५ व्या दिवशी पाकिस्तानविरुद्ध केलेल्या आंतरराष्ट्रीय पदार्पणापेक्षाही वैभवचे वय कमी असेल.

आयपीएलमधील धमाकेदार कामगिरी

राजस्थान रॉयल्ससोबतच्या आयपीएलच्या एका अप्रतिम हंगामानंतर सूर्यवंशीचे हे पदार्पण होत आहे. या स्पर्धेत १६ डावांत २३७.३० च्या अद्भूत स्ट्राईक रेटने ७७६ धावा करत तो सर्वाधिक धावा करणारा (ऑरेंज कॅप विजेता) फलंदाज ठरला होता.सीनियर भारतीय संघात सामील होण्याच्या अवघ्या काही दिवस आधी, सूर्यवंशी 'इंडिया अ' कडून 'श्रीलंका अ' विरुद्ध खेळत होता. तिथे त्याने लिस्ट-ए (List A) क्रिकेटमध्ये अवघ्या ११ चेंडूत अर्धशतक ठोकून सर्वात वेगवान अर्धशतकाचा विक्रम मोडीत काढला आहे.

"एक अत्यंत दुर्मिळ आणि अद्वितीय प्रतिभा" : राहुल द्रविड

या तरुण खेळाडूभोवतीची उत्सुकता वाढत असतानाच, भारताचे माजी प्रशिक्षक आणि राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी या किशोरवयीन खेळाड्यूबद्दल आपले विचार मांडले आहेत. 'बीबीसी'शी बोलताना द्रविड यांनी सूर्यवंशीचे वर्णन "एक अत्यंत दुर्मिळ आणि अद्वितीय प्रतिभा" असे केले.

काही गोष्टी या उपजतच लाभलेल्या असतात

"मला वाटते की गोलंदाजाचा वेग ओळखण्याची क्षमता, क्रिकेटची समज आणि निर्भयता यांचे हे एक अप्रतिम मिश्रण आहे. या अनेक गोष्टींचा तो एकत्र मिलाफ आहे. मला नाही वाटत की, वैभव सूर्यवंशीसारखा खेळाडू घडवण्याची कोणती ठरलेली रेसिपी (पद्धत) आहे. तुम्ही कोणत्याही मुलाला पकडून 'असं कर, म्हणजे तू इतका चांगला बनशील' असं सांगू शकत नाही. काही गोष्टी या उपजतच लाभलेल्या असतात." असेही द्रविड यांनी स्‍पष्‍ट केले.

केवळ नशीब नाही, तर कठोर परिश्रम

सूर्यवंशीचे यश केवळ नशिबामुळे किंवा नैसर्गिक प्रतिभेमुळे नाही. २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्समध्ये काम करतानाचे दिवस द्रविडने आठवले, जेव्हा या तरुणाने वयाच्या १४ व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याने खूप कठोर परिश्रमही केले आहेत, त्यामुळे ही केवळ देणगी नाही. लहानपणापासूनच त्याने हजारो चेंडूंचा सराव केला आहे. मी राजस्थान रॉयल्समध्ये ते स्वतः पाहिले असल्‍याचेही त्‍यांनी नमूद केले.

वैभव साख्‍या खेळाडूला तुम्हाला जपावे लागेल, त्याचे रक्षण करावे लागेल

वैभव आता आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात करत असताना, या किशोरवयीन खेळाडूच्या प्रगतीचे व्यवस्थापन अत्यंत काळजीपूर्वक करण्याच्या महत्त्वावर सल्‍ला द्रविड यांनी भर दिला. ते म्‍हणाले की, "मला फक्त एवढीच आशा आहे की, त्याच्यातील पूर्ण क्षमतेचा वापर करण्यासाठी या संपूर्ण प्रवासात त्याला योग्य पाठिंबा आणि मदत मिळेल.त्याच्यासारख्या खेळाडूला तुम्हाला जपावे लागेल, त्याचे रक्षण करावे लागेल; पण ही नेहमीच एक खूप नाजूक रेषा असेल, कारण कधीकधी तुम्हाला एखाद्याला मोकळे आकाश देऊन उंच उडू देणेही गरजेचे असते."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT