Chris Gayle: ‘कार्नेज....!’ 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या वादळी खेळीवर क्रिस गेल फिदा; केली मोठी भविष्यवाणी

Chris Gayle Reacts to Vaibhav Suryavanshi: राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशीने IPL 2026 मध्ये एका हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा क्रिस गेलचा विक्रम मोडला आहे.
Chris Gayle Vaibhav Suryavanshi
Chris Gayle Vaibhav SuryavanshiPudhari
Published on
Updated on

Chris Gayle Reacts to Vaibhav Suryavanshi’s Explosive Knock: IPL 2026 मध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या वैभव सूर्यवंशीने आणखी एक मोठा इतिहास रचला आहे. अवघ्या 15 व्या वर्षी त्याने क्रिकेटविश्वातील दिग्गज फलंदाज क्रिस गेलचा एक मोठा विक्रम मोडला असून, त्याच्या धडाकेबाज खेळीवर आता स्वतः ‘युनिव्हर्स बॉस’ क्रिस गेलही फिदा झाल्याचे दिसून आले आहे. इतकंच नाही, तर गेलने वैभवबाबत एक मोठी भविष्यवाणीही केली आहे.

बुधवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव करत क्वालिफायर-2 मध्ये धडक मारली. मात्र या विजया इतकीच जोरदार चर्चा झाली ती वैभव सूर्यवंशीच्या आक्रमक फलंदाजीची. या सामन्यात वैभवने अशी खेळी केली की, अनेक विक्रम एका झटक्यात त्याच्या नावावर जमा झाले.

क्रिस गेलचा मोठा विक्रम मोडला

IPL च्या एका हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम अनेक वर्षे क्रिस गेलच्या नावावर होता. 2012 मध्ये गेलने 59 षटकार ठोकले होते आणि त्यानंतर हा विक्रम कोणी मोडू शकला नाही. मात्र वैभव सूर्यवंशीने हा टप्पा पार करत आता एका हंगामात तब्बल 65 षटकारांचा आकडा गाठला आहे.

विशेष म्हणजे, स्पर्धा सुरू होण्यापूर्वी वैभवने एक मोठं विधान केलं होतं. “मला क्रिस गेलचा सर्वात वेगवान शतकाचा विक्रम मोडायचा आहे,” असं त्याने म्हटलं होतं. एलिमिनेटर सामन्यात तो या विक्रमाच्या अगदी जवळ पोहोचला होता. विक्रम मोडण्यासाठी त्याला एका चेंडूत फक्त 3 धावांची गरज होती. मात्र सीमारेषेजवळ झेलबाद झाल्याने त्याचा हा पराक्रम थोडक्यात चुकला.

‘Carnage...’; क्रिस गेलची प्रतिक्रिया चर्चेत

वैभवच्या खेळीवर प्रतिक्रिया देताना क्रिस गेलने इंस्टाग्राम स्टोरीवर त्याचा स्क्रीनशॉट शेअर केला. त्यासोबत त्याने लिहिले, “Carnage Vaibhav Suryavanshi… Unlucky, but you will get there.”

Chris Gayle Vaibhav Suryavanshi
Vaibhav Sooryavanshi: 6,6,6,6,6,6.. वैभव सूर्यवंशीची ऐतिहासिक कामगिरी; गेलचा महाविक्रम मोडीत काढत ठरला IPL चा नवा ‘सिक्सर किंग’

क्रिकेटच्या भाषेत ‘Carnage’ म्हणजे गोलंदाजांवर अक्षरशः तुटून पडणारा फलंदाज. जो मैदानाच्या चारही बाजूंना फटकेबाजी करत वेगाने धावा करतो. गेलने वैभवला ‘अनलकी’ म्हटले कारण तो सर्वात जलद शतकाच्या विक्रमापासून थोडक्यात दूर राहिला. मात्र, त्याने भविष्यात हा विक्रम नक्की मोडेल, असा विश्वासही व्यक्त केला.

‘IPL ची नवी Six Machine’

क्रिस गेलने आणखी एका इंस्टाग्राम स्टोरीमध्ये वैभवने यंदाच्या हंगामात केलेल्या विक्रमांचा उल्लेख केला आणि त्याला “IPL ची नवी Six Machine” अशी उपाधी दिली.

यंदाच्या हंगामात वैभव सूर्यवंशीने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. तो सर्वाधिक धावा करणारा अनकॅप्ड खेळाडू ठरला आहे. प्लेऑफ सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही त्याने केला. विशेष म्हणजे, 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेट राखत 600 हून अधिक धावा करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे.

Chris Gayle Vaibhav Suryavanshi
RR vs SRH | गेलच्या विक्रमावर सूर्यवंशीचा प्रहार; एक कोसळला, दुसरा थरथरला!

पॉवरप्लेमध्येही त्याची आक्रमकता पाहायला मिळाली. एलिमिनेटर सामन्यात त्याने पॉवरप्लेच्या षटकांतच तब्बल 8 षटकार ठोकले, जो मोठा विक्रम मानला जात आहे.

15 डावांत 680 धावा, ऑरेंज कॅप कायम

IPL 2026 मध्ये वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत 15 डावांत 680 धावा केल्या असून, ऑरेंज कॅपही सध्या त्याच्याकडे आहे. आता राजस्थान रॉयल्ससमोर फायनलमध्ये पोहोचण्यासाठी गुजरात टायटन्सचे आव्हान आहे. दोन्ही संघांमध्ये शुक्रवारी क्वालिफायर-2 सामना रंगणार असून, वैभव पुन्हा एकदा धडाकेबाज खेळी करतो का, याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news