IND vs AUS T-20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामनाही पावसामुळे वाया गेला. या मालिकेतील पहिला सामनाही पावसामुळे रद्द झाला होता. आता भारतीय संघाने मालिका २-१ अशी जिंकली आहे. २००८ पासून भारताने ऑस्ट्रेलियात एकही T-20 मालिका गमावलेली नाही.
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र सामन्याची ५ षटके झाल्यानंतर पावसानं सुरूवात केली. त्यामुळं खेळ थांबवण्यात आला आहे. खेळ थांबला त्यावेळी भारताच्या ४.५ षटकात बिनबाद ५२ धावा झाल्या होत्या. सलामीवीर अभिषेक शर्मा २३ धावांवर तर शुभमन गिल हा १६ चेंडूत २९ धावा करून नाबाद होता.
ब्रिसबेनमध्ये जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहे. मध्यंतरी पावसानं थोडी उसंत घेतली होती. त्यामुळं सामना सुरू होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र पावसानं पुन्हा सुरूवात केल्यानं अजून खेळ सुरू झालेला नाही.
४.५ षटकानंतर खराब हवामानामुळे सामना थांबवण्यात आला, खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतले; ४.५ षटकांत भारताने विनाबाद ५२ धावा केल्या आहेत.
अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल डावाची दमदार सुरुवात केली आहे. भारताने पाच षटकांत अर्धशतक पूर्ण केले आहे. शुभमन गिलने आक्रमक फलंदाजीचे प्रदर्शन करत १६ चेंडूत २९ धावा केल्या आहेत. पहिल्या चार षटकांत अभिषेकला दुसरा जीवनदान मिळाला. चौथ्या षटकात अभिषेकने नाथन एलिसच्या फाईन लेगकडे शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण द्वारशुईसच्या हातातून चेंडू सरकला. तो ११ धावांवर होता. चार षटकांनंतर भारताची धावसंख्या एकही बाद ४७ आहे. सध्या गिल १३ चेंडूत २७ धावा आणि अभिषेक ११ चेंडूत २० धावा करत खेळत आहे.
अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल डावाची दमदार सुरुवात केली आहे. भारताने तीन षटकांत बिनबाद ३५ धावा केल्या आहेत.
भारताचा डाव सुरू झाला आहे. अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल डावाची सुरुवात करण्यासाठी आले आहेत. दरम्यान, ऑस्ट्रेलियाकडून बेन द्वारशुईसने गोलंदाजीची सुरुवात केली. षटकाच्या चौथ्या चेंडूवर अभिषेकने शानदार चौकार मारला. त्यानंतर, पुढच्या चेंडूवर, तो पुन्हा मोठा फटका मारण्यासाठी गेला. तथापि, चेंडू लांब जाण्याऐवजी, चेंडू उंचावर गेला आणि मिड-ऑफवर उभ्या असलेल्या मॅक्सवेलपर्यंत पोहोचला, परंतु चेंडू त्याच्या हातातून निसटला आणि खाली पडला. यामुळे अभिषेकला जीवदान मिळाले. शुभमनने शेवटच्या चेंडूवर चौकार मारला. अशाप्रकारे, एका षटकानंतर भारताची धावसंख्या एकही विकेट न गमावता ११ धावा आहे.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने पाचव्या टी२० मध्येही नाणेफेक जिंकली आहे. मार्शने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. भारत प्रथम फलंदाजी करेल.
भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार), रिंकू सिंग, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर.
ऑस्ट्रेलिया संघ : मिचेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, टिम डेव्हिड, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, अॅडम झम्पा, बेन द्वारशुइस.