IND vs AUS T20 : भारताविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन संघातून ट्रॅव्हिस हेडसह ३ खेळाडू बाहेर, कारण...

Ind vs Aus T20 Series : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ सामन्यांची टी-२० मालिका तीन सामन्यांनंतर १-१ अशी बरोबरीत आहे.
IND vs AUS T20 : भारताविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन संघातून ट्रॅव्हिस हेडसह ३ खेळाडू बाहेर, कारण...
Published on
Updated on

ind vs aus 4th t20 australia squad changes sean abbott travis head out

भारताने रविवारी (२ नोव्हेंबर) झालेल्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या चमूतून तीन खेळाडूंना रिलिज करण्यात आले आहे.

'ॲशेस' मालिकेच्या तयारीसाठी ट्रॅव्हिस हेड आणि सीन ॲबॉट यांना टी-२० संघातून मुक्त करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, तनवीर संघा याला वनडे कप सामन्यात खेळण्यासाठी सोडण्यात आले आहे. दुखापतीतून सावरलेला बेन ड्वारशुइस संघात परतला आहे.

'ॲशेस'च्या तयारीसाठी हेड 'शेफिल्ड शील्ड'मध्ये खेळणार

इंग्लंडविरुद्धच्या बहुप्रतिक्षित 'ॲशेस' मालिकेच्या तयारीला ऑस्ट्रेलियाने सुरुवात केली आहे. यासाठी ट्रॅव्हिस हेड आता शेफिल्ड शील्ड स्पर्धेत साऊथ ऑस्ट्रेलिया संघाकडून खेळताना दिसणार आहे. हेड वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर (जुलैमध्ये) आपला पहिला प्रथम-श्रेणी सामना खेळणार असून, तो पुढील आठवड्यात होबार्ट येथे तस्मानियाविरुद्ध मैदानात उतरणार आहे.

IND vs AUS T20 : भारताविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन संघातून ट्रॅव्हिस हेडसह ३ खेळाडू बाहेर, कारण...
IND W vs SA W World Cup : शेफालीने फायनलमध्ये 87 धावा फटकावून रचला विश्वविक्रम! वडिलांना दिलेला शब्द खरा करून दाखवला

गेल्या महिन्यात व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये हेडची कामगिरी समाधानकारक राहिलेली नाही. ऑगस्टमध्ये द. आफ्रिकेविरुद्ध १४२ धावा केल्यानंतर, टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमधील त्याच्या आठ डावांमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या केवळ ३१ अशी राहिली आहे.

सीन ॲबॉटही 'ॲशेस'च्या तयारीसाठी बाहेर

जोश हेजलवुडच्या जागी भारताविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात खेळलेल्या सीन ॲबॉटलादेखील 'शेफिल्ड शील्ड'मध्ये न्यू साऊथ वेल्सकडून व्हिक्टोरियाविरुद्ध खेळण्यासाठी मुक्त करण्यात आले आहे. त्याला 'ॲशेस' मालिकेसाठी जखमी कर्णधार पॅट कमिन्सचा पर्यायी खेळाडू म्हणून पाहिले जात आहे. हेजलवुड आणि ॲबॉट यांच्यासह स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क आणि नॅथन लियॉन 'ॲशेस'साठी खेळताना दिसतील, तर त्यांच्याविरुद्ध स्कॉट बोलँड खेळेल.

IND vs AUS T20 : भारताविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन संघातून ट्रॅव्हिस हेडसह ३ खेळाडू बाहेर, कारण...
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाने वर्ल्डकपमध्ये रचला इतिहास! मिताली राजचा विक्रम मोडला; बनली नंबर १ भारतीय

तनवीर संघा 'वनडे कप' खेळण्यासाठी मुक्त

लेग-स्पिनर तनवीर संघाला सोमवारी (३ ऑक्टोबर) सिडनीमध्ये क्वीन्सलँडविरुद्ध होणाऱ्या 'वनडे कप' स्पर्धेत न्यू साऊथ वेल्सकडून खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियन टी-२० संघातून मुक्त करण्यात आले आहे. दुसऱ्यांदा पिता बनणाऱ्या ॲडम झाम्पा याचा पर्यायी खेळाडू म्हणून त्याची भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी निवड झाली होती.

ऑस्ट्रेलियाचा टी-२० संघ

मिचेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, महली बियर्डमन, टिम डेविड, बेन ड्वारशुइस, नॅथन एलिस, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस, मॅथ्यू कुहनेमन, मिचेल ओवेन, जोश फिलिप, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोइनिस, बेन मॅकडरमॉट.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news