Latest

Sonu Sood : सोनू सूदवर २० कोटींहून अधिक टॅक्स चोरीचा आरोप

अनुराधा कोरवी

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : Sonu Sood : कोरोना काळात हजारो मजुरांना स्थलांतरित करित मदतीचा हात देणारा अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याच्या मुंबई आणि दिल्लीतील कार्यालयांसह अनेक ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले. यावेळी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) सोनू सूदने २० कोटी रुपयांहून अधिक कर (टॅक्स) चोरी केल्याचे म्हटले आहे.

आयकर विभागाने मुंबईत सोनू सूदच्या (Sonu Sood) विविध भागात आणि पायाभूत सुविधांच्या विकासात गुंतलेल्या लखनौ स्थित औद्योगिक क्लस्टरमध्ये छापेमारीची कारवाई केली.

सलग तीन दिवसात मुंबई, लखनऊ, कानपूर, जयपूर, दिल्ली, गुरुग्रामसह एकूण २८ परिसरामध्ये छापे टाकण्यात आले. याच दरम्यान केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने २० कोटी रुपयांहून अधिक सोनूने कर चुकविल्याचे म्हटले आहे.

या छाप्यात सोनू सूद आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या घरासह अनेक कार्यालयांच्या ठिकाणी तपास करताना करचुकवेगिरीशी संबंधित अनेक पुरावे सापडले. यात सोनूने बनावट संस्थांद्वारे बोगस आणि असुरक्षित कर्जाच्या स्वरूपात बेहिशेबी पैसे जमा केल्याचे उघड झाले.

तसेच एफसीआरए (FCRA) कायद्याचे उल्लंघन करून क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्मचा वापर करून परदेशी देणगीदारांकडून २.१ कोटी जमा केल्याचे सीबीडीटीने म्हटले आहे. या सर्वातून सोनूने जवळपास २० कोटी रुपयांहून अधिक कर चुकविल्याचे निर्दशनास आले आहे.

याआदी सोनू सूदने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. दिल्ली सरकारच्या देशाच्या मार्गदर्शक कार्यक्रमाचे ब्रँड अॅम्बेसेडर तो बनला होता. याशिवाय सोनूने कोरोनाच्या काळात लोकांना मदत देखील केली होती.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT