सप्तश्रृंगी देवीच्या घाटामध्ये बिबट्याचे दर्शन | पुढारी

सप्तश्रृंगी देवीच्या घाटामध्ये बिबट्याचे दर्शन

सप्तश्रृंगीगड : पुढारी वुत्तसेवा

श्रीक्षेत्र सप्तश्रृंगी घाटामध्ये दहा किलोमीटरच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आले आहे. गेल्या दोन दिवसापासून बिबट्याचे दर्शन होत असल्याचे शेतात राहणारे शेतकरी सांगत आहेत.

काही दिवसांपूर्वीच वणी दिंडोरीच्या शिवारामध्ये बिबट्याचे अस्तित्व आढळून आले होते. दोन दिवसापासून सप्तश्रृंगीच्या जंगलांमध्ये किंवा घाटामध्ये सदर बिबट्याचे दर्शन होत आहे. त्यामुळे भागातील शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळेस जनावरांवर सातत्याने लक्ष ठेवावे लागत आहे.

सप्तश्रृंग परिसरामध्ये गेल्या आठ दिवसापासून मुसळधार पाऊस तसेच धुकेही पडत आले. यामुळे घनदाट झाडी वाढली आहे. याच घनदाट झाडीमुळे परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. आतापर्यंत सप्तश्रृंग परिसरात बिबट्याने कोणावर हल्ला केलेला नाही. शेतकरी व ग्रामस्थ सतर्क झाल्यामुळे आतापर्यंत बिबट्याने कोणाला भक्ष्य करता आलेले नाही.

Back to top button