bhima river | दौंड येथे भीमा नदीत बुडून दोघांचा मृत्यू - पुढारी

bhima river | दौंड येथे भीमा नदीत बुडून दोघांचा मृत्यू

दौंड : पुढारी वृत्तसेवा

दौंड येथील भीमा नदीत ( bhima river ) आज ( दि.१८ ) रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास दोन युवक अंघोळ करण्यासाठी नदी पात्रात गेले होते. यावेळी आवेश मुजफ्फर शेख ( वय १३ वर्ष ) व त्याचा सहकारी आदिल मेहबूब शेख ( वय १८ वर्ष ) हे पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. या दोघांचे मृतदेह तीन तासानंतर हाती लागले. भीमा नदीच्या ( bhima river ) तीरावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

अनेकांनी या दोन युवकांचा वेगवेगळ्या प्रकारे शोध घेतला व त्यांना कसे वाचता येईल याचा प्रयत्न केला. परंतु सर्वांनाच याबाबतीत अपयश आले. या दोघांचे मृतदेह पाहून सर्वांनाच हळहळ व्यक्त केली.

पोलीस निरीक्षक विनोद घुगे, पोलीस हवालदार सचिन बोराडे, अण्णा देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल रवी काळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोपत जाधव यांनी नागरिकांना बाजूला केले व नावाडी मच्छिमार यांनी बचावकार्यात मदत केली.

Back to top button