मनोरंजन

‘या’ लोकप्रिय मराठी मालिका, सातही दिवस भेटीला

स्वालिया न. शिकलगार

मुंबई; पुढारी ऑनलाईन : सोनी मराठीच्या प्रेक्षकांसाठी यंदाचा गणेशोत्सव, बाप्पांच्या आगमनाबरोबरच मनोरंजनाचा उत्सव ठरणार आहे. येत्या रविवारपासून, पाच सप्टेंबरपासून सातही दिवस मनोरंजनाचा उत्सव साजरा होणार आहे. 'गाथा नवनाथांची', 'तू सौभाग्यवती हो' आणि 'वैदेही' या तिन्ही मराठी मालिका आठवड्यातले सातही दिवस, सोमवार ते रविवार, प्रेक्षकांच्या भेटीला येतील. या लोकप्रिय मराठी मालिका पाहण्याची प्रेक्षकांना संधी मिळणार आहे.

दिव्य शाबरी मंत्र सर्वशक्तीने सिद्ध होण्याचा भव्यपट 'गाथा नवनाथांची' या मालिकेत सुरू आहे. मच्छिंद्रनाथांचं वेताळाबरोबर होणारं युद्ध प्रेक्षकांना खिळवून ठेवणारं आहे.

भव्य ग्राफिक्स, आध्यात्मिक कथानकाची नेमकी अभ्यासपूर्ण मांडणीमुळे याची लोकप्रियता वाढली आहे. कलावंतांचा अप्रतिम अभिनय यांमुळे 'गाथा नवनाथांची' अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.

खानदानी श्रीमंत कुटुंबाची सून झालेली. पण, वयाने अल्लड, खट्याळ असणार्‍या ऐश्वर्याच्या निरागस संसाराची गोष्ट नव्या वळणावर आहे. 'तू सौभाग्यवती हो' ही मालिका रंगतदार वळणावर आहे. आपल्या नवर्‍याने एकदातरी प्रेम व्यक्त करावं. ही ऐश्वर्याची आणि प्रेक्षकांची इच्छा देव पूर्ण करेल का, हा उत्सुकतेचा मुद्दा आहे.

या मालिकांची उत्सुकता

सीतेसारखी जन्मपत्रिका असलेल्या वैदेहीच्या आयुष्यात काय होणार, याकडे लक्ष आहे. रामाबरोबरच रावणाचाही प्रवेश झाल्याचे संकेत प्रेक्षकांना मिळाले आहेत. वैदेहीचं आयुष्य आता नक्की कोणतं वळण घेणार.नियतीचा काय संकेत असेल. अशी अनपेक्षित वळणं असलेल्या वैदेहीच्या आयुष्यात प्रेक्षक अल्पावधीतच गुंतून गेले आहेत. या तिन्ही मालिकांमधला हा रंजक कथाभाग आता सात दिवस अनुभवता येईल.

यंदाच्या गणेशोत्सवात, ५ सप्टेंबरपासून रोज संध्याकाळी साडेसहा वाजता मालिकांची शृंखला सुरू होते. सोनी मराठीवर महासोहळा रसिक प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

हेही वाचलं का ?

पाहा व्हिडिओ- पूरग्रस्तांच्या नुकसान भरपाईसाठी काढलेल्या पदयात्रेबाबत राजू शेट्टी यांची पत्रकार परिषद

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT