मनोरंजन

Free Hit Danka : ‘फ्री हिट दणक्या’ ने होणार सगळ्यांची ‘दांडी गुल’

अनुराधा कोरवी

मुंबई; पुढारी ऑनलाईन: क्रिकेट हा जोश, उत्साहाचा खेळ असून भारतात त्याला वेगळेच स्थान आहे. याच खेळावर आधारित 'फ्री हिट दणका' ( Free Hit Danka ) या आगामी चित्रपटातील 'दांडी गुल' हे गाणे सोशल मीडियावर रिलीज झाले आहे. याआधी चित्रपटातील 'रंग पिरतीचा बावरा' हे गाणे रिलीज झाले असून चाहत्यांचा त्याला माेठा प्रतिसाद मिळत आहे.

'दांडी गुल' हे गाणे 'फँड्री' फेम सोमनाथ अवघडे, अपूर्वा एस. तसेच 'सैराट' चित्रपटातील सुपरहिट जोडी अरबाज आणि तानाजी  यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्यासाठी सोमनाथ आणि तानाजी खूपच मेहनत घेतली आहे.

नृत्यदिग्दर्शक सुजित कुमार यांनी या गाण्याच्या चित्रीकरणाअगोदर सोमनाथ आणि तानाजी दोघांकडूनही १५ दिवस नृत्याची कार्यशाळा घेतली. या सरावादरम्यान त्याच्या पायाला किरकोळ दुखापत झाली होती. तरीही जिद्दीच्या जोरावर या गाण्यावर डान्स केला आहे. नेहमीपेक्षा वेगळ्या धाटणीचे, गावरान बाज असलेले  Free Hit Danka  हे गाणे प्रत्येकाला थिरकायला लावणारे आहे.

एसजीएम फिल्म्स प्रस्तुत 'फ्री हिट दणका' या चित्रपटात सुरेश विश्वकर्मा, अनिल नगरकर, गणेश देशमुख यांच्या मुख्य भूमिका आहेत. 'लय रुबाब दावू नका होईल दांडी गुल' असे या गाण्याचे बोल असून हे गाणे तरुणाईला वेड लावणारे आहे. आनंद शिंदे यांचा दमदार आवाज लाभलेल्या या गाण्याला बबन अडागळे आणि अशोक कांबळे यांनी संगीत दिले आहे.

सुनील मगरे दिग्दर्शित 'फ्री हिट दणका' या चित्रपटाची कथा आणि पटकथा सुनील मगरे यांची तर लेखन आणि संवाद संजय नवगीरे यांचे आहेत. आकाश अलका बापू ठोंबरे, मेघनाथ गुरुनाथ सोरखडे आणि सुनील मगरे चित्रपटाचे निर्माते आहेत. तर नितीन बापू खरात, सुधाकर लोखंडे यांनी सहनिर्मात्यांची धुरा सांभाळली आहे. १७ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातून क्रिकेटमधील संघर्ष, चुरस, उत्सुकता, डावपेच तसेच ग्रामीण भागातील रांगडेपणा, ग्रामीण भाषेतील लहेजा हे सर्व चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT