सई ताम्हणकरला IMDB च्या टॉप 10 मध्ये मिळालं मानाचं स्थान

सई ताम्हणकरला IMDB च्या टॉप 10 मध्ये मिळालं मानाचं स्थान
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन: अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच यशाची नवनवीन शिखरं पार करत असताना सध्या तिच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला. सईला IMDB च्या Best of 2021 च्या यादीत मानाचं स्थान मिळालं आहे.Internet Movie Database (IMDB) ने नुकतीच Top 10 Breakout stars of Indian films and webseries 2021 ची लिस्ट जाहीर केली. या यादीमध्ये IMDB ने सई ताम्हणकरचा उल्लेख करून तिचा गौरव केला आहे.

सईने यंदा 'समांतर', 'नवरसा' आणि 'मीमी' या तीन वेगवेगळ्या भाषांच्या कलाकृतींमधून वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकांव्दारे चाहत्याच्या रमनावर आपली ठसा उमटवला. Internet Movie Database (IMDB) ने यांची दखल घेत सईला 'breakout star' म्हटले आहे. याबाबतची माहिती सईने स्वत: सोशल मीडियावर दिली आहे, यानंतर तिच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

या सन्मानाविषयी सई ताम्हणकर म्हणाली की, 'आयएमडीबी हा ग्लोबल प्लॅटफॉर्म आहे. कलाकृतीला भाषेचं बंधन न लावता, त्याकडे पाहण्याचा विस्तीर्ण दृष्टिकोण ग्लोबल सिनेमाचा आणि वेबसीरिजचा असतो. अशा ठिकाणी माझ्या कामाचा गौरव होणं ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. आयएमडीबीसारख्या प्लॅटफॉर्मने आपल्या कामाचा असा गौरव करावा ही माझ्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे.'

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news