मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने (Tejaswini Pandit's New look) लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेक कलाकारांनीही तिच्या या हटके लूकवर भरभरून कमेंट्स केल्या आहेत.
तेजस्विनीने या फोटोमध्ये ब्लॅक टॉप आणि गोल्डन रंगाची डिझाईन असलेला मिनी स्कर्ट घातला आहे. त्याचबरोबर तिने न्यू हेअरस्टाईलही केली आहे. या लूकमध्ये तिने वेगवेगळ्या अंदाजात फोटोशूट केले आहे आहे. तिचे हे हटके फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिचे फोटो पाहून तिच्या चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. तू आणि तुझं सौंदर्य एखाद्या आंतरराष्ट्रीय मॉडेल पेक्षा काहीही कमी नाही..!, तेज च तेज, आप की आँखों में कुछ महके हुए से राज़ है !!, अरे कोण आहे ही? खुशाल आपल्या तेजस्विनीच नाव लावतेय!, कोमल काया की मोहमाया पुनव चांदणं न्हाली…अशा भन्नाट कमेंट्स तिच्या फोटोंवर येत आहेत.
तेजस्विनीचा हा लूक (Tejaswini Pandit's New look) पाहून, ती मनी हायस्ट या वेबसीरिजमधील टोकियो वाटतं आहे…, पुणेची टोकियो…, मनी हायस्टमध्ये तुम्हाला घ्यायला पाहिजे होतं…, मला वाटलं टोकियोचं आहे… अशा कमेंट्स तिच्या फोटोंवर केल्या आहेत.
सध्या चर्चेत असणारी स्पॅनिश वेब सीरिज मनी हायस्ट. मनी हायस्टच्या खिळवून ठेवणाऱ्या कथानकाने आणि अभिनयाने सर्वांचे मन जिंकले आहे. यातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. यातील एक पात्र म्हणजे टोकियो. टोकियोची भूमिका र्सुला कॉर्बेरो या अभिनेत्रीने साकारली आहे. र्सुला कॉर्बेरोने आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकले आहे.
तेजस्विनीने अनेक चित्रपटात, वेबसीरिजमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. नुकतीच ती समांतर २ या वेबसीरिजमध्ये झळकली आहे. तेजस्विनीचा अभिनयाबरोबरचं तेजाज्ञा हा साड्यांचा ब्रॅंड आहे.