मनोरंजन

Phir Na Aisi Raat Aayegi Song : ‘लाल सिंग चड्ढा’मधील अरिजित सिंगच्या गाण्याला चाहत्यांची पसंती

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : लाल सिंह चड्ढा या चित्रपटातील फिर ना ऐसी रात आएगी (Phir Na Aisi Raat Aayegi Song) हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. यामध्ये पुन्हा एकदा अरिजित सिंगचा मधुर आवाज ऐकून चाहत्यांना भूरळ पडलीय. अनेक ट्विटर युजर्सनी या गाण्याबद्दल ट्विट केले आहे. काही सोशल मीडिया युजर्सनी गायक अरिजितचे उत्कृष्ट गाणे म्हणून कौतुक केले आहे. (Phir Na Aisi Raat Aayegi Song)

'लाल सिंह चड्ढा' चित्रपटातील 'फिर ना ऐसी रात आएगी' हे नवीन गाणे अखेर रिलीज झाले आहे. हे गाणे ऐकल्यानंतर हे गाणे आतापर्यंतचे सर्वात भावनिक संगीत आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. प्रीतमने संगीतबद्ध केलेले हे गाणे अरिजित सिंगने गायले आहे. काही काळापूर्वी आमीर खानने करीना कपूर खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. यामध्ये करीना चित्रपटातील 'फिर ना ऐसी रात आयेगी' हे गाणे दशकातील सर्वोत्कृष्ट गाणे असल्याचे म्हणताना दिसली. (Phir Na Aisi Raat Aayegi Song)

आमिरने हे गाणे टी-सीरीजच्या सोशल मीडिया हँडलवर लाईव्ह होताच लॉन्च केले. याआधी 'लाल सिंग चड्ढा'ची 'कहानी' आणि 'मैं की करा' ही दोन गाणी संगीतप्रेमींच्या काळजाला भिडणारी होती. आता या नव्या गाण्याचे ट्विटरवर खूप कौतुक होत आहे.

अरिजित सिंगच्या आवाजावर चाहत्यांची मनं जिंकली

पुन्हा एकदा अरिजित सिंगचा मधुर आवाज ऐकून चाहत्यांना त्यांचा उत्साह आवरता आला नाही. अनेक ट्विटर युजर्सनी या गाण्याबद्दल ट्विट केले आहे. काहींनी याला उत्कृष्ट नमुनाही म्हटले आहे. युजरने ट्विट केले की, 'मास्टरपीस. अरिजित सिंगने ते खूप प्रेमाने गायले आहे. खूप गोड आवाज. दुसऱ्याने लिहिले की, 'या चित्रपटाचा म्युझिक अल्बम खूप चांगला आहे. ही गाणी लोकांच्या मनावर छाप सोडणार आहेत.

हेही वाचा :  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT