पुढारी ऑनलाईन डेस्क :
बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी आज राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली. बसपाने द्रौपदी मुर्मू यांचे समर्थन करण्याचा निर्णय घेतला आहे, असा मायावती यांनी लखनौ येथे आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केले.
यावेळी मायवती म्हणाल्या की, आमचा पक्ष हा आदिवासी समाजच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. त्यामुळे राष्ट्रपती निवडणुकीत आम्ही भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना समर्थन देणार आहोत. याचा अर्थ आम्ही रालोआ आणि भाजप यांचे समर्थन करतो असे होत नाही. आदिवसाी महिला देशाची राष्ट्रपती होण्यासाठी आम्ही दौपद्री मुर्मू यांचे समर्थन करणार आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात विरोधी पक्षांची बैठक बोलवली होती. या बैठकीत राष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधी पक्षाच्या उमेदवाराबाबत निर्णय घेण्यात येणार होता. यानंतर शरद पवार यांनी २१ जून रोजी एक बैठक घेतली. या बैठकीसाठी बसपाला निमंत्रण नव्हते. यामधून विरोधी पक्षांचा जातीवाद स्पष्ट होतो, असा आरोप मायावती यांनी या वेळी केला.
आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करणार्या द्रौपदी मुर्मू यांचे समर्थन आम्ही करणार आहाेत. आमच्या पक्षाने हा निर्णयामध्ये रालोआचे नेतृत्त्व करणार्या भाजपचे समर्थन करण्यासाठी घेतलेला नाही. तर आम्ही आमच्या पक्षाच्या धोरणांवर वाटचाल करत आहे, असे मायावती यांनी या वेळी स्पष्ट केले.
हेही वाचा :