पुढारी ऑनलाईन
डिस्ने+ हॉटस्टारने त्यांच्या आगामी थरारक मेडिकल ड्रामा 'ह्यूमन'ची घोषणा केली आहे. कीर्ती कुल्हारी या अभिनेत्रीसह राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री शेफाली शाह मुख्य भूमिकेत असणार आहे. ही सीरीज सनशाइन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडचे विपुल अमृतलाल शाह निर्मित आणि विपुल अमृतलाल शाह, मोजेझ सिंग यांनी दिग्दर्शित केली आहे. मोझेझ सिंग आणि इशानी बॅनर्जी यांनी या मालिकेचे लेखन केले आहे. 'ह्युमन' एक मालिका म्हणून वैद्यकीय जगाची अनपेक्षित रहस्ये उलगडते, तसेच ही सीरिज वैद्यकीय नाट्यमय जग आणि त्याचा लोकांवर होणारा परिणाम यावर भाष्य करते, असे विपुल अमृतलाल शाह यांनी म्हटलं आहे.
या सीरिजबाबत निर्माता आणि सह-दिग्दर्शक विपुल अमृतलाल शाह म्हणाले. मी ३ वर्षे 'ह्युमन'च्या स्क्रिप्टवर एक चित्रपट म्हणून काम करत होतो. तेव्हा मला लक्षात आले की, याचा विषय दोन ते अडीच तासाच्या चित्रपटामध्ये बसवता येणे शक्य नाही. त्यानंतर मी मोजेझ सिंग यांच्याशी संपर्क साधला. त्यांना स्क्रिप्ट दिली. त्यांनी ती खूप आवडली.
मोसेस सिंग यांनी इशानी बॅनर्जी यांना टीममध्ये घेतले. त्यानंतर स्तुती नायर आणि आसिफ मोयल यांनी ही सीरिज लिहायला सुरुवात केली. आम्हाला या सीरिजमध्ये वैद्यकीय जगाचे अचूकपणे प्रतिनिधित्व करतानाच यातील पात्रांचे वैयक्तिक नातेसंबंध आणि त्यांच्या संघर्षाचे देखील चित्रण करायचे होते. आणि आम्हाला विश्वास आहे आणि आशा आहे की प्रेक्षकांना ही सीरिज नक्कीच आवडेल, असेही ते म्हणाले.
हेही वाचलं का?
disney