मनोरंजन

Shamita : राकेश बापटवर प्रेमाचा वर्षाव, किस नंतर पुसले लिपस्टिकचे डाग

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची धाकटी बहिण शमिता शेट्टी (Shamita Shetty) आज २ फेब्रुवारी रोजी आपला वाढदिवस साजरा करत आहे. 'मोहब्बतें' चित्रपटातून तिने अभिनय करिअरची सुरुवात केली खरी परंतु, यानंतर तिचे काही चित्रपट फ्लॉप होत गेले. यामुळे तिच्या करिअरला हळूहळू ब्रेक लागत गेला. नुकतेच ती 'बिग बॉस १५' मधून देखील बाहेर पडली. परंतु, सोशल मीडियावर ती नेहमी सक्रिय असते. सध्या शमिताने आपला वाढदिवस बॉयफ्रेंड आणि बहिण शिल्पा शेट्टीसोबत खूप खास शैलीत साजरा केला आहे.

नुकताच शिल्पाने आपली बहिण शमिताचा (Shamita Shetty) वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. या कार्यक्रमात शमिताचा बॉयफ्रेंड राकेश बापटसोबत राजीव अदातिया, निशांत भट्ट आणि प्रतीक सहजपाल या स्टार्सनी हजेरी लावली. वाढदिवसाचे काही फोटो आणि व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या कार्यक्रमातील एका व्हिडिओत शमिता आपल्या घरातून बाहेर पडल्यानंतर बॉयफ्रेंड राकेश बापट तिला किस करून वाढदिवसाचे गिफ्ट देतो. ही घटना कॅमेऱ्यात कैद होताच शमिता वाढदिवसाचे रिटर्न गिप्ट द्यायला सांगितले जाते. यावेळी ती देखील राकेशला किस करते. यातील खास म्हणजे. राकेशच्या गालावरील लिपस्टिकचा डाग शमिताने ताबोडतोब आपल्या हाताने मिटवताना देखील दिसली आहे.

शमिता आणि राकेश बापट दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओतून दोघेही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. या व्हिडिओत शमिताने ग्रे रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे. यावेळी राकेश ब्लॅक रंगाचा शर्ट आणि पांढऱ्या रंगाच्या पॅन्टमध्ये दिसला. याशिवाय या व्हिडिओच्या कॅप्शममध्ये दोघांनी आपआपल्या नावे लिहिली आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडयावर शेअर होताच बॉलिवूड स्टार्ससोबत चाहत्यांनी कॉमेंन्टस पाउस पाडला आहे. यात काही युजर्संनी शमिताला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. दुसऱ्या एका युजर्सने 'सार्वजनिक ठिकाणी प्रेम दाखवण्या पेक्षा घरी जावून किस करा' असे लिहिले आहे. याशिवाय काही चाहत्यांनी हार्ट आणि प्रेमाचा ईमोजी शेअर केला आहे.

याच दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने जुन्या आठवणींना उजाळा देत शमिताचा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शिल्पाने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, 'मला तुला नेहमी असेच आनंदी पाहायचे आहे. माझ्या वाघिणी, तू आनंदी रहावे अशी माझी इच्छा आहे. या वाढदिवसानिमित्त तुझी सर्व स्वप्ने सत्यात उतरू दे हाच तुला आशिर्वाद आहे. तुझ्यावर खूपच प्रेम आणि अभिमान आहे. हे वर्ष तुला चांगले जावो, येणाऱ्या वर्षात माझ्या प्रियजनांकडून भरभरून आशीर्वाद मिळो,♥️? ????♥️असे लिहिले आहे.

हेही वाचलंत का? 

(video : viralbhayani and theshilpashetty instagram वरून साभार)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT