PUSHPA film : ‘पुष्‍पा’मधील केशव विकायचा ‘फ्रेंच फ्राईज’! | पुढारी

PUSHPA film : 'पुष्‍पा'मधील केशव विकायचा 'फ्रेंच फ्राईज'!

पुढारी ऑनलाईन

सगळीकडे पुष्पा (PUSHPA film) चित्रपटाचीच चर्चा सुरू आहे. या चित्रपटामधील प्रत्येक कलाकाराविषयी जाणून घेतलं जात आहे. तुम्हाला माहिती आहे का, केशवची भूमिका साकारणारा कोण आहे? जो नेहमी अल्लू अर्जुनच्या मागे मागे राहत असतो-तो केशव. केशव म्हणजेच जगदीश प्रताप भंडारी (Jagadeesh Pratap Bhandari). सुखात-दु:खात तो पुष्पासोबत असतो. सुरूवातीला तर वाटत होतं की, दोघे गुरू-शिष्य असतील. पण, नंतर त्यांची मैत्री पाहून जय-वीरूची आठवण आली. (PUSHPA film)

चित्रपटात केशवची एंट्री तेव्हा होते, जेव्हा तो आपल्या मालकासोबत एका कारखान्यात आलेला असतो. तेथे पुष्पाला बसलेला पाहून तो आश्चर्यचकित होतो आणि इम्प्रेस होतो. पुष्पा आपल्या नोकरीला लाथ मारतो. त्यामुळे प्रेरित होऊन तो पुष्पासोबत (PUSHPA film) राहण्याचा निर्णय घेतो. पुष्पादखील त्याला आपल्यासोबत प्रत्येक ठिकाणी घेऊन जातो. प्रत्येक सीनमध्ये ते दोघे एक-दुसऱ्यांना प्रोटेक्ट करताना दिसतात. इतकचं नाही, श्रीवल्ली प्रकरणात देखील केशवची भूमिका खूप सपोर्टिव्ह दाखवण्यात आलीय.

पुष्पाला  श्रीवल्ली पाहत देखील नाही. तेव्हा तोच केशव आपल्या मित्राला पुष्पाला खुश करण्यासाठी डोकं लावतो. रश्मिकाच्या मैत्रीणींना तो हजार रुपये देतो. अल्लू अर्जुनला पाहून हसण्यासाठी हे पैसे केशवने त्यांना दिलेले असतात. तो पाहता पाहता त्याचा उजवा हात केशव बनतो. अखेरला तो पूर्ण बँक-बँलन्स वगैरे पाहू लागतो.

केशव आहे तरी कोण?

केशवचं खरं नाव जगदीश प्रताप भंडारी आहे. जगदीशने तेलुगु चित्रपट इंडस्ट्रीत काम केलं आहे. १८ जानेवारी, १९९३ रोजी तेलंगानामध्ये त्याचा जन्म झाला. तो सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे १३.६ हजार तर ट्विटरवर ४१८० फॉलोअर्स आहेत.

थिएटर्समध्ये विकायचा फ्रेंच फाईज

एका मुलाखतीत त्य़ाने सांगितलं होतं की, त्‍याने पाेलीस खात्‍यात जावे, अशी त्‍याच्‍या वडिलांची इच्‍छा हाेती; पण त्यांनी आपलं करिअर अभिनय क्षेत्रात केलं. चित्रपटात येण्यापूर्वी तो सेल्स एक्झीक्युटिव्हचा काम करायचा. तो थिएटर्समध्ये फ्रेंच फाईज आणि स्वीट कॉर्नचा पुरवठा करायचा. नंतर तो तेलंगानाहून हैदराबाद आला. खूप संघर्षानंतर प्रोडक्शन हाऊस प्रसाद स्टुडिओने आपल्या एक शॉर्ट फिल्ममध्ये त्याला भूमिका ऑफर केली.

जगदीश भंडारी २०१८ मध्ये MicTV चा यूट्यूब शो ‘निरुद्योग नटुलु’ दिसला होता. यानंतर त्याने २०१९ मध्ये तेलुगु वेब सीरीज ‘गॉड ऑफ धर्मापुरी’ मध्येही काम केलं. त्याला लोकप्रियता मिळाली ती ‘माल्लेशम’ चित्रपटातील (Mallesham) अंजी या भूमिकेमुळे. हा चित्रपट चिंताकिंदी माल्लेशम यांच्या जीवनावर आधारित होती. यानंतर त्याने आणखी एका बायोपिकमध्य़े काम केलं.

गोल्ड मेडलिस्ट जॉर्ज रेड्डी यांच्या आयुष्यावरील चित्रपटातदेखील त्या भीम नायक नावाच्या लेखकाची भूमिका साकारली होती.यानंतर त्याने २०२० मध्ये रोमँटिक ड्रामा वेब सीरीज ‘कोथा पोराडू’ मध्ये काम केलं. यामध्ये त्याची भूमिका एका साध्या तरुणाची होती. याच वर्षी दुसरी चित्रपट समाजातील जातीव्यवस्थेवर आधारित होती. यामध्येही त्याने काम केलं. या चित्रपटाचं नाव होतं -‘पलासा १९७८’.

आता २०२२ मध्ये क्राईम-ड्रामा-थ्रिलर चित्रपट ‘पिक पॉकेट’ येणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट अद्याप गुलदस्त्यात आहे.

हेही वाचलं का? 

Back to top button