पुढारी ऑनलाईन : 'इंडियन आयडॉल १२' मधील टॉप ६ स्पर्धकांपैकी एक सायली कांबळे हिची चर्चा होतेय. सायली कांबळे लोकप्रिय ठरली होती. महाराष्ट्राची लाडकी गायिका सायलीने आता आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. तिचा सह-स्पर्धक निहाल टोरोसोबत तिचं नाव जोडलं गेलं होतं. पण, सायलीने आता तिच्या प्रेमाबद्दल सांगितलंय. तिने आपल्या प्रेमाचा खुलासा करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय.
सायलीने इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट टाकलीय. तिने तिच्या बॉयफ्रेंडसोबतचा फोटो अपलोड केलाय. तिने बॉयफ्रेंडचं नावही सांगितलंय.
सायलीने बॉयफ्रेंडसोबत एक रोमँटिक फोटो शेअर केलाय. तिने फोटोला कॅप्शन लिहिलीय. 'चलो जी आज साफ साफ कहती हूँ, इतनी सी बात है मुझे तुमसे प्यार है' -धवल. धवल असे तिच्या बॉयफ्रेंडचं नाव आहे.
तिने हा फोटो पोस्ट केल्यानंतर तिला नेटकऱ्यांकडून शुभेच्छा मिळत आहे. तर एका नेटकऱ्याने म्हटलंय की -'आज बहुत लोगों का दिल तुटेगा.'
सायलीच्या आईचे आजोबा संगीत शिक्षक होते. आईचाही आवाज सुंदर आहे. पण, आईला संगीत शिकता आलं नाही. माझा आवाज देवाने दिलेली देणगी आहे. माझ्या आईकडून हा आवाज मला मिळाला आहे, अशी भावना तिने व्यक्त केली.
माझ्या वडिलांना किशोर कुमार फार आवडतात. त्यांचं नावही किशोर आहे. माझं गाणं म्हणताना जर काही चुकलं तर ते मल समजावून सांगतात.
सायलीला गाण्य़ात करिअर करायचं आहे, असं सांगितल्यानंतर तिच्या कुटुंबीयातील सर्वांना चिंता होती. पण, कुटुंबीयांनी तिच्यावर विश्वास ठेवला.
जॉब कर, असं घरातील मंडळींचं म्हणणं हतं. स्पर्धा परीक्षांचाही तिने अभ्यास केला. पण, तिला गाण्यात करिअर करायचं होतं आणि त्या दिशेने तिने आपलं मार्गक्रमण सुरू केलं.
पाहा व्हिडिओ- अलका कुबल-आठल्ये यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला पुढारीची टिम भेटीला..