मनोरंजन

Marathi Web Series : माणसाला माणसांशी जोडणारी ‘सपान’ सीरीज प्रदर्शित

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला स्वप्न पाहण्याचा अधिकार आहे. गरीब माणूसही स्वप्न बघू शकतो आणि पूर्णही करू शकतो. स्वप्न बघायला कधीच बंधन नसतं. (Marathi Web Series) स्वप्न पूर्ण करायला हिंमत, जिद्द आणि आपल्या माणसांची गरज असते. अशाच एका परब कुटुंबाची आणि त्यांच्या स्वप्नांची गोष्ट म्हणजे "सपान". निखिल रायबोले आणि भुपेंद्रकुमार नंदन निर्मित, अभिजित पेंढारकर लिखित, सुयोग संजय हांदे दिग्दर्शित ही नवी मराठी वेब सीरीज प्रदर्शित झाली आहे. (Marathi Web Series)

सीरीज बद्दल दिग्दर्शक सुयोग हांदे सांगतात की, आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला हसत खेळत कसं सामोरं जायचं हे या वेबसीरीजमधील प्रत्येक पात्राकडून शिकता येईल. माणसं माणुसकीने जोडता येतात पैशाने नाही हे या वेबसीरीजमधून तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. चित्रीकरण झालेला कोकणातील निसर्गरम्य परिसर प्रेक्षकांना नक्कीच सुखावणारा असेल. गाण्यांचा गोडवा तुम्हाला कोकणातल्या तुमच्या आठवणी पुनरुज्जीवित करेल.

या सीरीजमध्ये अमोल रेडीज, ऐश्वर्या वखारे, ऋषभ तोडणकर, अर्चना पेणकर-पांचाळ, अलका कोळपे -मांगले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गीते अनिकेत कदम यांची असून ती रत्नाकर महाकाल आणि तृप्ती जाधव यांनी गायली आहेत. त्याला भाग्येश पाटील यांनी  संगीत दिले आहे. जय मनोरे यांची सिनेमाटोग्राफी असून जगदीश शेलार यांचे कला-दिग्दर्शन लाभले आहे. दिग्दर्शन सहाय्य तन्वी महाडिक, ग्राफिक्स अभिषेक डुबल यांचे आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT