HBD Apurva Nemalekar : महाराष्ट्राची लाडकी शेवंता मुळात आहे तरी कशी? जाणून घ्या

happy birthday Apurva Nemalekar
happy birthday Apurva Nemalekar
Published on
Updated on

आभास हा या मालिकेतून मालिका क्षेत्रात पदार्पण करणारी अपूर्वा नेमळेकर ही शेवंता म्हणून रात्रीस खेळ चाले २ (ratris khel chale) या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचली. (HBD Apurva Nemalekar) 'रात्रीस खेळ चाले-२' या मालिकेत तिने शेवंता हे पात्र साकारून सर्वांची मने जिंकली. दुप्पट वयाच्या हिरोबरोबर काम करून ती अल्पावधीत लोकप्रिय बनली. तिच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी माहिती आहेत का? आज २७ डिसेंबर रोजी तिचा वाढदिवस. या निमित्ताने जाणून घेऊया तिच्याबद्दल या खास गोष्टी. (HBD Apurva Nemalekar)

१) अपूर्वा नेमळेकरचा मूळ स्वभाव खोडकर आहे.

२) तिला वेगवेगळे पदार्थ चाकायला आवडतात. शूटिंच्या सेटवरही तिचं डिशेस खाणं चालू असतं.

३) अपूर्वाला सजायला, नटायला फारसं आवडत नाही. तिला विना मेकअप राहायला आवडतं.

४) लॉकडाऊनमध्ये घरी असता अपूर्वाने भरपूर वाचन केलं, वेगवेगळ्या भाषेतील चित्रपट पाहिले.

५) तिला स्वयंपाक करायला आवडतं. वेगवेगळे पदार्थ करणं आणि घरच्यांना खाऊ घालणं आवडतं. तसेच पेंटिंग्ज करणंदेखील आवडतं.


६) अपूर्वाला पाणीपुरी खूप आवडते, मासेदेखील खायला आवडतात. ती मूळची कोकणातील आहे.

७) तिने रुपारेल कॉलजमधून बॅचलर मॅनेजमेंट ऑफ स्टडीजमधून शिक्षण घेतलं आहे.

८) जर ती अभिनेत्री झाली नसती तर लंडनला एका कंपनीत मार्केटिंगमधून करिअर केलं असतं.

९) मजामस्ती, टवाळखोरी करणं, मित्रांसोबत असणं असा तिचा शाळेतला स्वभाव होता.

१०) शेवंताचे फोटो तिचा भाऊ काढतो. ती अनेकदा आपल्या भावासोबत लॉन्ग ड्राईव्हला जाते. एकदा भावाने काढलेले तिचे फोटो व्हायरल झाल्यानंतर तिला तीन भूमिकांची ऑफर मिळाली होती.

११) सावंतवाडीत पावणे दोन वर्षे 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेचं शूटिंग सुरू होतं.

१२) 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतील शेवंता या पात्रासाठी तिने १२ किलो वजन वाढवलं होतं. परंतु, पम्मी ही भूमिका तरुणीची आहे, यासाठी तिला वजन कमी करावं लागलं.

१३) अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या शेवंताने 'तुझं माझं जमतयं' मालिकेत पम्मीची भूमिकेत आहे.

१४) 'रात्रीस खेळ चाले' ज्या दिवशी संपलं, त्याच्या दुसऱ्या दिवशी पम्मीच्या भूमिकेसाठी तिला ऑफर मिळाली. पम्मी ही कॉमेडी भूमिका होती.

१५) अपूर्वाला अनेक चित्रपटांची, मालिकांची ऑफर आली होती. त्या मालिकेत शेवतासारखं पात्र असणाऱ्या भूमिका होत्या. म्हणून तिने या भूमिका स्वीकारल्या नाहीत. तिला पम्मी ही हटके भूमिका करायची होती, म्हणून तिने 'तुझं माझं जमतंय' भूमिका निवडली.

१६) नाटक, वेब सीरीज, मालिका आणि चित्रपट अशा चारीही माध्यमातून अपूर्वा प्रेक्षकांच्या भेटीला आलीय.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news