

बॉलीवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ गरोदर असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. कॅटरिना आणि विकी कौशल यांनी नाताळच्या सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले; मात्र या फोटोत चाहत्यांची नजर फक्त कॅटरिनाकडेच गेली. ती फोटोत सर्वांच्या मागे लपत असल्याचे दिसून येत आहे. ख्रिसमस सगळीकडेच उत्साहात साजरा झाला अख्खे बॉलीवूड ख्रिसमस सेलिब्रेट करण्यात दंग होते. कॅटरिना कैफ विकी यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले आहे.. दोघांनी कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा करत असतानाचे फोटो पोस्ट केले आहेत; मात्र यामध्ये कॅटरिना एकाही फोटोत पूर्ण दिसत नाही. कोणाच्या ना कोणाच्या मागे उभी असल्याचे प्रत्येक फोटोत दिसून येते. यावर चाहत्यांनी लगेच तर्कवितर्क लावायला सुरुवात केली. कॅटरिना प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. यावर अजून कॅटरिना किंवा विकी दोघांनीही प्रतिक्रिया दिली नाही.