Sai Lokur 
मनोरंजन

Sai Lokur : हवा मैं उडता जाये मेरा लाल दुपट्टा (video)

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'बिग बॉस मराठी' फेम आणि अभिनेत्री सई लोकूर ( Sai Lokur) सध्या बालीमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. या व्हेकेशनचे नवनविन अनेक हॉट फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी सई लाल रंगाच्या आऊटफिटमध्ये दोरीच्या झोपाळ्यावर झुलताना हटके दिसतेय. सईच्या या फोटोंवर चाहत्यांनी 'Beautiful red luk ??❤❤', 'Amazing ❤️❤️', 'So sweet', 'Looking nice❤', 'Fantastic saii❤️', 'Beautiful ❤️'.असे म्हणत अनेक कॉमेन्टचा पाऊस पाडला आहे.

सई लोकूर ( Sai Lokur ) नुकतेच व्हेकेशन एन्जॉय करण्यासाठी कुटूंबियासोबत बालीमध्ये पोहोचली आहे. बाली तेथील तिने पक्षी संग्रालय ( बर्ड पार्क), प्राणी संग्रालय, जंगलाची सफर, समुद्र बीच, Yellow Bridge, मारा नदीची सफर, नुसा पेनिडा बेटाची सफर केली. याच दरम्याचे सईने प्रत्यके ठिकाणचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यातील खास म्हणजे, सईने लाल रंगाच्या लॉग आऊटफिटमध्ये बाली येथील एका बागेत आणि उंच दोरीच्या झोपाळ्यावर झोका घेताना दिसतेय.

तर काही ठिकाणी तिने सुंदर अशा गोलाकार आकाराच्या शोभेच्या लाकडी नक्षीकामात बसून हटके पोझ दिली आहे. यात सईचा रेड ड्रेस, मोकळे केस, मेकअप आणि आजुबाजूच्या सौंदर्य अप्रतिम आहे. हे लाकडी नक्षीकाम दोन झाडांमध्ये उंचावर केले आहे. याच दरम्यान सई बागेत देखील मनमुराद आनंद लुटत आहे.

सईने शेअर केलेल्या व्हिडिओला 'उडता ही फिरू इन हवाओं में कहीं, या में जल जाऊॅ…'. आणि .काजल की साई से लिखी, है तुम्हे जाने कितनो की लव्हस्टोरी… या गाण्याचे बोल व्हिडिओमध्ये बाजत आहेत. तर फोटोच्या कॅप्शनमध्ये Saved the best one for last!, Its such a Bali thing ❤, Loved being at. असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. हे फोटो आणि व्हिडिओज चाहत्याच्या पसंतीस उतरले आहेत. तर सईने बालीमधील सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या 'हंडारा गेट' येथे तिने फोटोशूट केले आहे. यातील काही फोटोत ती यलो (पिवळ्या) रंगाच्या स्विमसूटमध्ये पाण्यात मौजमस्ती करताना दिसतेय. तर काही फोटोत सईचे जंगली प्राण्यांवरील प्रेम दिसून येत आहे.

व्हिडिओला चाहत्यांनी भरभरून कौतुक करताना Beautiful ?, Beautiful red luk ??❤❤, queen of arth❤️, Pretty ❤️, nice❤️, Amazing ❤️, Looking nice❤?, So sweet ?, Omg gorgeous ? ❤️, Khup chan, Cool❤️❤️, Stunning❤️, Beauty in black?. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. यासिवाय काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजींनी कॉमेन्टस बॉक्स भरला आहे. बाली येथील व्हेकेशनचे अनेक फोटो सईच्या इंन्स्टाग्रामवर पाहायला मिळतात. या फोटोला १ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहेत.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT