Monalisa Bagal : बहिणच मोठा भाऊ! मोनालिसाने बांधली बहिणीला राखी | पुढारी

Monalisa Bagal : बहिणच मोठा भाऊ! मोनालिसाने बांधली बहिणीला राखी

पुढारी ऑनलाईन डेस्क : भावांसाठी रक्षाबंधनाचे जितके महत्त्व असते तितकेच महत्त्व बहिणी-बहिणींसाठीदेखील असते. (Monalisa Bagal) मोठा भाऊ या नात्याच्या असणाऱ्या सर्व जबाबदाऱ्या मोठी बहीण पार पाडत असते म्हणून छोट्या बहिणीसाठी ती तिचे रक्षण करणार्‍या भावासारखीच ठरते.  (Monalisa Bagal)

एकमेकांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या मराठी इंडस्ट्रीतील बहिणी अभिनेत्री मोनालिसा बागल आणि अश्विनी बागल यांनी रक्षाबंधनाचा सण साजरा केला.

बहिणी पण दुसऱ्या बहिणीची रक्षा करु शकते, एकमेकींना साथ देऊ शकते आणि त्यांच्यातील बंधन हे आणखी प्रेमाने घट्ट होऊ शकते हे मोनालिसा बागल आणि अश्विनी बागल यांच्या नात्यातून दिसून येते. पाहा त्यांचे रक्षाबंधन स्पेशल फोटो.

हेही वाचा : 

Back to top button