मनोरंजन

शाहिद-मीरा राजपूतचा रोमँटिक क्षण व्हायरल, लिपलॉक फोटोने धुमाकूळ

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन; बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत ( शाहिद-मीरा ) चित्रपटांच्या झगमटापासून दूर असली तरी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती नेहमी आपले हॉट फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. सध्याही तिच्या एका लिपलॉक फोटोने सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे.

मीराने नुकताच आपल्या इंन्स्टाग्रामवर अकाउंटवर पती शाहिद कपूरसोबतचा ( शाहिद-मीरा ) एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. या फोटोत मीरा शाहिदला किस करताना दिसत आहे. मीराने मिरर सेल्फी घेतला आहे. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने 'संडे बिंज' असे लिहिले आहे.

या फोटोतील खास म्हणजे, दोघांचे चेहरे दिसत नसून एका मोबाईलने झाकलेला आहे. मीराने यावेळी स्काय ब्लू रंगाचा ड्रेस तर शाहिदने राखाडी रंगाचा टी-शर्ट घातला आहे. या फोटोने सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत आहे. दोघांच्यातील रोमँटिक अंदाज चाहत्यांना पाहायला मिळाला आहे.

हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी अनेक भरभरून आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात 'हे किसिंग सीन आहे की आणखी काय?, हा शाहिद कपूर आहे का दुसरा कोण आहे?' यासारखे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. तर दुसऱ्या एका युजर्सने 'अरे वाह, क्युट.' असे लिहिले आहे. तर तिसऱ्या एका युजर्सने हे 'परफेक्ट कपल आहे'. असे लिहिले आहे. याशिवाय काही चाहत्यांनी हार्ट आणि फायरचा ईमोजी शेअर केला आहे.

याआधी मीराने आदल्या दिवशी एक मिरर सेल्फ शेअर केला आहे. यामध्ये तिने फ्लोरल प्रिंटचा डीप नेक शर्ट घातला आहे. या फोटोत मीराने खूपच ग्लॅमरस दिसत आहे. या फोटोसोबत कॅप्शनमध्ये तिने 'With a side of sunshine please ☀️' लिहिले आहे. मीराच्या फोटोला बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने इमोजीद्वारे प्रेम व्यक्त केले आहे.

शाहिद कपूर आणि मीरा राजपूत हे बॉलिवूडमधील सर्वात सुंदर कपल्सपैकी एक आहेत. मीराचे इंन्स्टावर नेहमी हॉट फोटो पाहायला मिळतात. तर मृणाल ठाकूरसोबत शाहिदचा 'जर्सी' चित्रपटात दिसला आहे. 'जर्सी' हा तेलगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट ३१ डिसेंबर २०२१ रोजी रिलीज झाला आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT