परभणी : दोन सख्ख्या भावांसह चुलत भावाचा अपघातात जागीच मृत्यू ; ट्रकने दिली टक्कर | पुढारी

परभणी : दोन सख्ख्या भावांसह चुलत भावाचा अपघातात जागीच मृत्यू ; ट्रकने दिली टक्कर

जिंतुर (परभणी) : पुढारी ऑनलाईन

शहरापासून ३ किमी अंतरावर असलेल्या अकोलीजवळील पुलावर ट्रकचा आणि दूचाकीचा भीषण अपघात झाला. यात दुचाकीवरून जाणा-या मालेगाव येथील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (दि. २४) सकाळी साडेनऊच्या दरम्यान घडली. या अपघातात तीन भावांचा दुदैवी मृत्यू झाला. यातील दोघे दोन सख्खे भाऊ असून एक चूलत भाऊ आहे. अभिषेक काशिनाथ मेहेत्रे, योगेश काशिनाथ मेहेत्रे, रामा विश्वनाथ मेहेत्रे अशी मृतांची नावे आहेत.

सविस्तर माहिती अशी की, मालेगाव येथील अभिषेक काशिनाथ मेहेत्रे, योगेश काशिनाथ मेहेत्रे हे सख्खे भाऊ व त्यांचा चुलत भाऊ रामा विश्वनाथ मेहेत्रे हे नेहमी प्रमाणे मालेगाववरून जिंतुर शहराकडे दुकानावर कामा निमित्त दुचाकीने (क्र. एमएच 26 ए. व्हि. २८३४) जात होते. दरम्यान त्यांच्या दूचाकीला अकोली जवळील पुलावर जिंतूरहून जालनाच्या दिशेने जाण्याकडे जात असलेल्या ट्रक (क्र. एमएच १८ बी.जी. ६७७०)ची जोराची धडक बसली. या भीषण अपघातात तिघांचाही जागीच मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती समजताच पोलिस निरिक्षक दीपक शिंदे, एपीआय गंगाधर गायकवाड यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देवून पंचनामा करत मृतदेह शव विच्छेदनासाठीसाठी जिंतूर ग्रामीण रुग्णालयात पाठवले. यावेळी मालेगाव व शहरातील नागरिकांनी गर्दी केली होती.

Back to top button