मनोरंजन

Prajkta Gaikwad : प्राजक्ताने वारीत धरला ताल, तुळस डोक्यावर घेत लुटला आनंद

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : नाचू कीर्तनाचे रंगी म्हणत मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajkta Gaikwad) हिने डोक्यावर तुळस घेऊन वारीचा आनंद लुटला. वारीत प्राजक्ताने वांगी कलरची साडी नेसून फुगडी घातली. शिवाय वारकऱ्यांच्या सोबत टाळवर ताल धरला. तिचे वारीतील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. (Prajkta Gaikwad)

तिने डोक्यावर तुळस घेतलेला फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय –

छोट्या पडद्यावरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेतून प्राजक्ता गायकवाड हिला लोकप्रियता मिळाली होती. तिने या मालिकेत 'येसू बाई' यांची व्यक्तीरेखा साकारली होती. या मालिकेतून प्राजक्ता गायकवाड घराघरांत पोहोचली. ही मराठमोळी अभिनेत्री सोशल मीडियावरही ॲक्टीव्ह असते. ती तिचे व्हिडिओज आणि फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असते. आतादेखील तिने काही सुंदर फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

फिटनेस फ्रिक आहे प्राजक्ता

प्राजक्ता फिटनेसबाबत कायमच दक्ष असते. मध्यंतरी, तिचा डंबेल्स उचलून व्यायाम करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. अभिनयासोबत फिटनेसदेखील महत्त्वाचा आहे. शूटिंग करून रात्री दहा वाजता घरी आले, तरी जिममध्ये जाते, असं प्राजक्ता म्हणतेय. प्राजक्ताला नृत्याची देखील आवड आहे.

सुंदर दिसणाऱ्या प्राजक्ताचे सोशल मीडियावर फॅन फॉलोइंगसुद्धा मोठा आहे. ती आपल्या जीवनातील विविध घडामोडी प्राजक्ता चाहत्यांसोबत शेअर करत असते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT