

ताथवडे : येथील पुणे-मुंबई महामार्गावरील गाडा रस्त्यावरील एका मॉलजवळ अवैधरित्या लावलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. सेवा रस्त्यावर नो पार्किंगचा बोर्ड लावला आहे. तरीही सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दुचाकी आणि चारचाकी मोठी वाहने लावली जात असल्यामुळे परिसरात वाहतूककोंडी होत होती.
सायंकाळच्या वेळी वाहतूक पोलिस या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपलब्ध असूनदेखील या नो पार्किंग झोनमध्ये पार्क केलेल्या वाहनांवर कोणतीही ठोस कारवाई केली जात नव्हती. या संदर्भातील वृत्त 'दैनिक पुढारी'मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर वाहतूक पोलिसांनी नो पार्किंगमध्ये लावलेल्या गाड्यांवर कारवाई केली आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.