पिकोलो चित्रपट  
मनोरंजन

Picolo Movie : संगीताचा सूर घेऊन पिकोलो प्रेक्षकांच्या भेटीला

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी चित्रपटांमधून नाविन्यपूर्ण विषयांची निवड जाणीवपूर्वक होऊ लागली आहे. (Picolo Movie ) प्रेक्षकही त्याकडे मोठया प्रमाणात आकर्षित होताना दिसत आहेत. हीच बाब ध्यानात घेऊन फोर्टिगो मोशन पिक्चर प्रा.लि प्रस्तुत आणि अभिजीत मोहन वारंग दिग्दर्शित 'पिकोलो' या मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. येत्या २६ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. राजेश मुद्दापूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. (Picolo Movie)

आजच्या पिढीसमोर असणारे प्रश्न, त्यांना पेलावी लागणारी आव्हाने या साऱ्याचं चित्रण करत नातेसंबंधांचे सूक्ष्म पदर संगीताच्या माध्यमातून अलगदपणे उलगडून सांगणारा 'पिकोलो' हा संगीतमय चित्रपट आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच श्री क्षेत्र शिर्डी येथे साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यात आले. प्रत्येकालाच आयुष्यात काही ठोस असे ईप्सित साध्य करायचे असते त्यात अनेक अडथळे येतात, त्यावर मात करून पुढे जायचे असते. या चित्रपटातही हा संघर्ष आहे. या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत असलेले प्रेमीयुगुल जगण्याच्या संघर्षावर संगीताची फुंकर घालून त्यातून कसा मार्ग काढतात? हे 'पिकोलो' चित्रपटात पाहणं रंजक ठरणार आहे. प्रणव रावराणे आणि अश्विनी कासार यांची मध्यवर्ती भूमिका या चित्रपटात आहे.

या दोघांसोबत 'पिकोलो' चित्रपटात किशोर चौघुले, अभय खडपकर, दीक्षा पुरळकर, नमिता गावकर, पद्मा वेंगुर्लेकर, विश्वजीत पालव, मिलिंद गुरव, हर्षद जाधव, रघु जगताप, रोहन जाधव, हर्षद राऊळ, शुभम सुतार, हर्षद परब, विद्याधर कार्लेकर आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.

चित्रपटाची कथा प्रमोद शेलार यांची आहे. छायाचित्रण कार्तिक परमार तर संकलन पराग सावंत यांचे आहे. संगीत आणि ध्वनीरचना आनंद लुंकड यांचे आहे. कलादिग्दर्शनाची जबाबदारी नरेंद्र भगत यांनी सांभाळली आहे. असोसिएट प्रोड्युसर सागर म्हात्रे तर कार्यकारी निर्माते राजू आर के झेंडे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT