पतंग उडवण्यासाठी नियमावली; राजस्थान सरकारचा निर्णय | पुढारी

पतंग उडवण्यासाठी नियमावली; राजस्थान सरकारचा निर्णय

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  मकर संक्रातीला पतंग उडवण्याची अनेक राज्यात परंपरा आहे. आपला पतंग उंचच उंच उडवून दुसर्‍याचा पंतग कापण्यात मोठे थ—ील असते, पण गेल्या काही वर्षांपासून चायनिज मांज्यामुळे या आनंदावर विरजण पडताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राजस्थान सरकारने आता पतंगबाजीवर नियम जारी केले आहेत. यापुढे सकाळी सहा ते आठ आणि सायंकाळी पाच ते सात या वेळेतच पंतग उडवता येणार आहेत.

राजस्थान उच्च न्यायालयाने 2012 मध्येच अशा प्रकारचे आदेश दिले होते. पण ते अद्याप अंमलात आणले गेले नव्हते. आता राज्य सरकारने या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याचे ठरविले आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कलम 144 अंतर्गत पोलिस कारवाई करणार आहेत. देशात चायनिज मांजामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. कित्येकांना इजा पोहोचली आहे. त्यामुळे चायनिज किंवा सिंथेटिक मांजा वापरणार्‍यांवरही पोलिस कडक कारवाई करणार आहेत. यात अटकेची कारवाईही होऊ शकते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान या आदेशामुळे ऐन संक्रांतीच्या सणाच्या दिवसातच पंतगप्रेमी हिरमुसले आहेत.

Back to top button