मनोरंजन

मीरा जगन्नाथ हिला आवरला नाही मोह, सामी सामीवर थिरकले पाय

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

येऊ कशी तशी मी नांदायला या झी मराठी वाहिनीतील अभिनेत्री मीरा जगन्नाथ सध्या तिच्या डान्स व्हिडिओवरून चर्चेत आहे. मीरा जगन्नाथ बिग बॉस मराठी सीजन तिसऱ्या भागात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. याआधी तिने येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत मोमोची भूमिका साकारली होती. तिचे या मालिकेतील विचित्र कपडे, विचित्र लूक, ऑड कलर लिपस्टिक सर्व काही चर्चेत होतं. पण, ती एक सेक्सी आणि हॉट मॉडेल आहे. तिने एक डान्स व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या सगळीकडे चर्चेत आहे.

सध्या पुष्पा चित्रपटातील सामी सामी या गाण्याची मोठी क्रेझ सगळीकडे पाहायला मिळतेय. सामी सामी हे गाणे साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्यावर चित्रीत करण्यात आले आहे. तिची या गाण्यातील युनिक स्टेप लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या पसंतीस उतरली आहे. मीरालादेखील सामी सामी गाण्यावर डान्स स्टेप करण्याचा मोह आवरला नाही. तिचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. तिच्या या व्हिडिओवर खूप सारे कमेंट्स पाहायला मिळाले.

मॉडेल, अभिनेत्री आहे मीरा 

मादक अदांनी घायाळ करणाऱ्या मीराविषयी तुम्हाला माहिती आहे का? तिचे सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओज पाहायला मिळतात. मीरा मॉडेलिंगच्या क्षेत्रात सक्रिय आहे.

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून तिने मराठी टीव्ही इंडस्ट्रीत डेब्यू केला होता. या टीव्ही मालिकेत तिने संजना ही व्यक्तिरेखा साकारली होती. तिची ही छोटीशी भूमिका होती. या भूमिकेतून ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली.

"येऊ कशी तशी मी नांदायला" या मालिकेत तिने मोमोची भूमिका साकारली आहे. मालिकेत मीरा एका श्रीमंत घरातील मुलीची भूमिका साकारली आहे. इन्स्टाग्रामवर ती नेहमी ॲक्टिव्ह असते.

तिचा जन्म मुंबईत झाला. तिने आपले शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतून पूर्ण केले. मुंबई विद्यापीठातून आर्ट्समधून तिने महाविद्यालयीन शिक्षण घेतले. कॉलेज जीवनात तिने अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला होता.

ती Independent या वेब सीरीजमध्येही झळकली होती. ती खूप फिटनेस फ्रिक आहे. तिला योगा करायला आवडते. युट्यूबवरदेखील तिचे व्हिडिओ पाहण्यास मिळतात. इन्स्यावर तिचे 78.4k followers आहेत. तिला ट्रॅव्हलिंग आवडते. संगीत आणि विविध पदार्थ चाखायला तिला आवडतात.

SCROLL FOR NEXT